शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

चिपळूणच्या पाणथळीत अवतरला दुर्मिळ ‘ब्लॅक हेरॉन’!, भारतात प्रथमच नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:36 IST

डॉ. श्रीधर जोशी यांच्या निरीक्षणातून समोर आली भारतातील पहिली नोंद

चिपळूण : चिपळूणच्या पाणथळ परिसरात नुकतेच ब्लॅक हेरॉन अर्थातच काळे बगळे जातीचे दोन अद्वितीय आफ्रिकन पक्षी दिसले. चिपळुणातील पक्षिनिरीक्षक डॉ. श्रीधर जोशी यांच्या सजग नजरेमुळे अत्यंत दुर्मीळ आणि भारतात आजवर न दिसलेला पक्षी प्रथमच आढळून आल्याची नोंद झाली आहे. ही घटना पक्षी अभ्यासकांच्या दृष्टीने ऐतिहासिक मानली जात आहे.डॉ. जोशी हे दररोज सकाळी पक्षिनिरीक्षणासाठी फिरायला जात असतात. रविवारी, ३ ऑगस्ट रोजी सकाळी फिरताना त्यांनी एका पाणथळ जागी दोन काळे बगळे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मासे पकडताना पाहिले. त्यांनी त्वरित त्यांच्या कॅमेऱ्यात हे क्षण टिपले आणि घरी आल्यावर अधिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने सखोल अभ्यास केला. त्यावेळी त्यांना समजले की, जगात ‘कॅनोपी फीडिंग किंवा अम्ब्रेला फीडिंग’ ही अनोखी मासे पकडण्याची शैली केवळ ब्लॅक हेरॉन या आफ्रिकन पक्ष्यातच दिसून येते. आपले पंख अर्धवर्तुळात पसरण्याची या बगळ्यांची अनोखी युक्ती माशांना सावलीखाली आकर्षित करते आणि त्यांना सहज पकडता येते.

सुरुवातीला हा रातबगळा असल्याचा अंदाज काही निरीक्षकांनी व्यक्त केला. मात्र लांब पाय, संपूर्ण काळे शरीर आणि ‘कॅनोपी फीडिंग’ची खास शैली या वैशिष्ट्यांवरून सर्वांचे एकमत झाले की, तो पक्षी म्हणजेच ब्लॅक हेरॉनच आहे. ही माहिती व छायाचित्रे डॉ. जोशी यांनी ‘इंडियन बर्ड जर्नल’कडे पाठवली असून, भारतात या पक्ष्याची ही पहिलीच अधिकृत नोंद असल्याचे प्राथमिक संकेत आहेत.

ब्लॅक हेरॉन कोण?ब्लॅक हेरॉन हा मुख्यतः पश्चिम आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणारा निवासी पक्षी आहे. सेनेगल, सुडान, केनिया, टांझानिया, मोझांबिक आणि मॅडगास्कर हे त्याचे नैसर्गिक अधिवास आहेत. युरोपातही काही अपवादात्मक नोंदी (ग्रीस, इटली, डब्लिन) आहेत. मात्र भारतात आजवर या पक्ष्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नव्हता. हा पक्षी स्थलांतर करत नाही. केवळ अन्नपाण्याची कमतरता असल्यास तो परिसर बदलतो. त्यामुळे त्याच्या चिपळूणमध्ये अचानक झालेल्या आगमनाने आश्चर्य व्यक्त होत आहे.काय आहे ‘कॅनोपी फीडिंग’?ही एक विशिष्ट मासे पकडण्याची शैली असून, पक्षी आपल्या पंखांचा अर्धगोलाकार छत्रीसारखा आकार तयार करतो. त्या सावलीत मासे आकर्षित होतात आणि मग पक्षी त्यांच्यावर सहज झडप घालतो. ही शैली प्रामुख्याने ब्लॅक हेरॉनमध्येच दिसते.

आफ्रिकेतील हे पक्षी इथे कसे आले, हे अद्याप अनाकलनीयच आहे. गेल्या आठवड्यापासून मी ते पुन्हा पाहण्यासाठी विविध पाणथळ ठिकाणी शोध घेत आहे. — डॉ. श्रीधर जोशी, पक्षिनिरीक्षक, चिपळूण