‘आयएसओ’साठी खेडमधील दोन शाळांची धडपड

By Admin | Updated: January 15, 2016 00:20 IST2016-01-14T21:17:37+5:302016-01-15T00:20:56+5:30

शिक्षण विभाग : धामणदिवी, चोरवणे शाळांचे प्रयत्न

Two schools in Khed for 'ISO' are struggling for two schools | ‘आयएसओ’साठी खेडमधील दोन शाळांची धडपड

‘आयएसओ’साठी खेडमधील दोन शाळांची धडपड

श्रीकांत चाळके --खेड तालुक्यातील जिल्हा परिषद धामणदेवी शाळा नं. १ व चोरवणे नं. १ या शाळा राज्य सरकारचे आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या मानांकनासाठी आवश्यक असलेले ४३ निकष पूर्ण करून आयएसओ मानांकन मिळविणारच, असा वज्रनिर्धार या दोन शाळांमधील शिक्षकांनी केला आहे. जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये खेड तालुक्यातील या दोन शाळांचा समावेश करण्यात आला आहे.
गुुहागर तालुक्यातील अंजनवेल शाळा नं. २ या जिल्हा परिषद शाळेला राज्यातील आयएसओ मानांकन मिळाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील २१ शाळांना आयएसओ मानांकन मिळवून देण्याचा प्रयत्न डायटने सुरू केला आहे. त्यादृष्टीने आयएसओ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या हेतूने या शाळांतील शिक्षकांची आतापासूनच धडपड सुरू झाली आहे. शिक्षकांसह ग्रामस्थ आणि हितचिंतकांनीही या शाळेच्या मानांकनासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच डाएटमार्फत जिल्ह्यातील २७ शाळांमधील शिक्षकांना मानांकनाच्या कामकाजाची माहिती घेण्यासंदर्भात नेण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे ओझे पाठीवर असतानाच शिक्षकांनी या उपक्रमाच्या दिशेने घेतलेली झेप निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.
सध्या स्थानिक पातळीवर अनेक समस्या आणि प्रश्न जिल्हा परिषद शांळाच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरू पाहत आहेत. जिल्हा परिषद शाळांसमोर खासगी शिक्षण संस्थांच्या वाढत्या संख्येचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवाय इंग्रजी माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याकडे बहुतांश पालकांचा कल आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या पालकांची मुले जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. आयएसओ मिळवण्यासाठी या शाळांची धडपड सुरु आहे.

आयएसओ मानांकन मिळाल्यास जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत मिळणार आहे. याकरिताच डायट अशा शाळांच्या मानांकनासाठी प्रयत्नशील आहे़ आयएसओ मानांकनासाठी एकूण ४३ निकष पूर्ण करावयाचे आहेत. जुने रेकार्ड, विद्यार्थ्यांसाठी मिळणाऱ्या सेवा सुविधा व गुणवत्ता, सौरऊर्जा व गांडुळ खत प्रकल्प, ई-लर्निंग असे विविध ४३ निकष पूर्ण करावे लागणार आहेत.


कोकणातील पहिली आयएसओ मानांकन मिळालेली शाळा म्हणून गुहागर तालुक्यातील अंजनवेल नं. २ या जिल्हा परिषद शाळेचे उदाहरण सर्वांसमोर आहे़

Web Title: Two schools in Khed for 'ISO' are struggling for two schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.