शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३५ टॉप शाळांमध्ये रत्नागिरीतील दोन शाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 16:58 IST

शालेय शिक्षण विभागामार्फत ‘लेटस चेंज’ या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ बनवण्यात आले

रत्नागिरी : शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘लेटस चेंज’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २,१३० शाळेतील ६४,९६७ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. सहभागी झालेल्या लाखो शाळांमधून उत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप शाळांमध्ये १०० शाळांची निवड करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत निवडण्यात आलेल्या टॉपच्या ३५ शाळांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दाेन शाळांचा समावेश आहे. गुहागर व खेड तालुक्यातील या शाळा आहेत.शालेय शिक्षण विभागामार्फत ‘लेटस चेंज’ या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ बनवण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील ३८ लाख विद्यार्थी आमूलाग्र बदल घडवून महाराष्ट्राला कचऱ्याबाबत निष्काळजीमुक्त करणार आहेत. या उपक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील लाखो शाळांमधून १०० टॉप शाळांची निवड करण्याचे शासनाने घोषित केले होते. शासनाने आत्तापर्यंत राज्यातील ३५ टॉप शाळांची निवड केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद कुडली शाळा क्रमांक ४ आणि खेड तालुक्यातील भडगाव येथील आर. डी. ज्ञानदीप विद्यामंदिर या शाळांचा समावेश आहे. लवकरच राज्यातील आणखी टॉपच्या ६५ शाळांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी काही शाळांचा समावेश असेल, अशी आशा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

‘स्वच्छता माॅनिटर’ जागेवर दाखविणार चूकहे ‘स्वच्छता मॉनिटर’ कुठेही येताना-जाताना कोणी बेफिकीरपणे थुंकताना किंवा कचरा टाकताना दिसल्यास त्याच जागी त्या व्यक्तीला थांबवणार आणि झालेली चूक दर्शवून देत सुधारायला सांगण्याचे काम करणार आहेत.

साफसफाई करायची नाहीदोन महिन्यांच्या ‘लेटस चेंज’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून एकदाही साफसफाई करून घ्यायची नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या चित्रकला, वक्तृत्व आदी स्पर्धा आयोजित करावयाच्या नाहीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळा