चिपळुणातील अपघातात दोघेजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:40+5:302021-09-11T04:32:40+5:30
चिपळूण : मुंबई -गोवा महामार्गावरील कामथे घाटात शुक्रवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या दोन दुचाकी अपघातात दोनजण जखमी झाल्याची ...

चिपळुणातील अपघातात दोघेजण जखमी
चिपळूण : मुंबई -गोवा महामार्गावरील कामथे घाटात शुक्रवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या दोन दुचाकी अपघातात दोनजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघात प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिलीप गंगाराम करंडे (३७, रा. शिवाजीनगर, चिपळूण ) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून करंडे हे आपल्या ताब्यातील मोटारसायकल घेऊन सावर्डेहून चिपळूणकडे येत असताना मुंबईहून येणाऱ्या अन्य मोटारसायकल स्वाराने एसटी बसला बाजू घेत असताना करंडे यांच्या दुचाकीला धडक देऊन अपघात केला. अपघातामध्ये करंडे यांच्यामागे बसलेले पुरुषोत्तम पडवेकर यांच्यासह करंडे जखमी झाले आहेत. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, अपघातास कारण ठरलेला दुचाकीस्वार रूपेश नारकर याच्याविरुद्ध करंडे यांच्या तक्रारीनुसार चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.