खेडमधून लांब पल्ल्याच्या दोन बसफेऱ्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:57+5:302021-05-27T04:32:57+5:30

खेड : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ग्रामीण भागातील तसेच लांब पल्ल्याच्या मार्गावरील बसफेऱ्यांना ‘ब्रेक’ लावण्यात आला होता. नुकतेच येथील एस. ...

Two long haul buses start from Khed | खेडमधून लांब पल्ल्याच्या दोन बसफेऱ्या सुरू

खेडमधून लांब पल्ल्याच्या दोन बसफेऱ्या सुरू

खेड : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ग्रामीण भागातील तसेच लांब पल्ल्याच्या मार्गावरील बसफेऱ्यांना ‘ब्रेक’ लावण्यात आला होता. नुकतेच येथील एस. टी. प्रशासनाने लांब पल्ल्याच्या मार्गावरील दोन बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळी १० वाजता खेड-बोरिवली बसफेरी सुरू करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासात बोरिवली येथून सकाळी ७.३० वाजता बसफेरी परतीचा प्रवास करेल. दुसरी फेरी सकाळी १० वाजता खेड-पुणे-चिंचवड अशी धावत आहे. परतीच्या प्रवासात ही बसफेरी रात्री १० वाजता पुणे-चिंचवड येथून सुटेल. कोरोना नियमांचे पालन करून या बसफेऱ्या धावणार आहेत.

बसमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. ‘अत्यावश्यक सेवे’साठी किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत अंत्यसंस्कार किंवा गंभीर आजारांवरील औषधोपचारासाठी प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Two long haul buses start from Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.