विचित्र अपघातात दोघे ठार; तिघे गंभीर--
By Admin | Updated: September 1, 2014 22:53 IST2014-09-01T22:53:35+5:302014-09-01T22:53:35+5:30
खेड तालुक्यातील उधळे येथील दुर्घटना : तीन वाहनांचा अपघात, मृत प्रवासी लाडघरचे

विचित्र अपघातात दोघे ठार; तिघे गंभीर--
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील उधळे-लाडवाडी येथे तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एका महिलेसह दोघेजण ठार झाले. आज, सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. एस. टी. बसला ओव्हरटेक करणारी क्वालीस समोरून येणाऱ्या टेम्पोवर आदळल्याने हा अपघात झाला. अपघातग्रस्त क्वालीसमधील सर्वजण एकाच कुटुंबातील होते आणि ते गणेशोत्सवासाठी म्हणून गावाकडे येत होते.
दीपिका दीपक बागकर (वय ४२) आणि विशाल अहीर (३०, क्वालिस चालक) अशी ठार झालेल्या दोघांची नावे असून, दीपक विठ्ठल बागकर (५१), मोरेश्वर दीपक बागकर (२५) आणि वैभव दिगंबर बागकर (२३, सर्व रा. मुंबई) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण मूळचे दापोली तालुक्यातील लाडघर येथील रहिवासी आहेत.
भांडूप-गुहागर ही बस (एमएच २० एबी २७४५) काल, रविवारी रात्री भांडूपहून गुहागरला जाण्यासाठी निघाली. त्याच दरम्यान बागकर कुटुंबीयही भांडूपहून निघाले. ते संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावाकडे जात होते. मुंबई-गोवा महामार्गावर उधळे लाडवाडी येथे क्वालिसने भांडूप-गुहागर बसला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून टेम्पो (एमएच-१0 झेड ६१९४) आला. (पान १० वर)