वेरळ घाटात ट्रेलर बंद पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST2021-06-05T04:23:35+5:302021-06-05T04:23:35+5:30

लांजा : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रेलर अचानक बंद पडल्याने दाेन तास वाहतूक ठप्प झाल्याचा प्रकार लांजात तालुक्यातील ...

Two hours traffic jam due to trailer closure in Veral Ghat | वेरळ घाटात ट्रेलर बंद पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प

वेरळ घाटात ट्रेलर बंद पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प

लांजा : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रेलर अचानक बंद पडल्याने दाेन तास वाहतूक ठप्प झाल्याचा प्रकार लांजात तालुक्यातील वेरळ घाटातील वळणावर घडला़. हा ट्रेलर सुरू न झाल्याने दोन तासाने ट्रेलर उताराने हळूहळू मागे घेऊन वेरळ थांब्यावर आणण्यात आला़.

मुंबईहून ६४ चाकी ट्रेलर गोव्याच्या दिशेने जात असताना, शुक्रवारी सकाळी १० वाजता वेरळ घाट चढत असताना यू वळणावर अचानक बंद पडला़. त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांची कोंडी झाली हाेती. ट्रेलरच्या एका बाजूला असणाऱ्या जागेतून छाेटी वाहनांची ये-जा सुरू हाेती़. हा ट्रेलर दुरूस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला़; मात्र त्यात अपयश आल्याने दोन तासाने ट्रेलर उताराने हळूहळू मागे घेऊन वेरळ थांब्यावर आणण्यात आला़. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली़

--------------------------

लांजा तालुक्यातील वेरळ घाटात मुंबईहून गाेव्याच्या दिशेने जाणारा ट्रेलर बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली हाेती़. (छाया : अनिल कासारे)

Web Title: Two hours traffic jam due to trailer closure in Veral Ghat