शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

पालखी नाचवण्यावरून दोन गटात राडा, ८ जण जखमी, रत्नागिरीतील वेरवलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:54 IST

दोन्ही गटातील ९ जणांवर गुन्हे दाखल

लांजा : मांडावर पालखी नाचवण्यावरून झालेल्या वादातून घरी जाताना दोन गटात राडा झाल्याची घटना साेमवारी (१३ मार्च) रात्री वेरवली खुर्द राणेवाडी (ता. लांजा) येथे घडली. या हाणामारीत ८ जण जखमी झाले असून, दोन्ही गटातील ९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.संतोष सीताराम राणे (४५) यांनी फिर्याद दिली आहे. मांड या ठिकाणी पालखी नाचविण्यासाठी गेलो असता शैलेश श्रीधर राणे यांनी मला व एकनाथ गुणाजी राणे यांना पालखी नाचविण्यास विरोध केला. त्यावेळी आमच्यामध्ये झटापट झाली व शैलेश याने हाताने मारहाण केली. मांडावरील ग्रामस्थांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. त्यानंतर एकनाथ राणे व महेश मनोहर राणे आणि त्यांच्या पाठीमागून शैलेश व त्यांचा पुतण्या रोशन चालले होते. मारुती मंदिर येथे रात्री ११:४५ वाजता हे समोरासमोर आल्याने शाब्दिक चकमक उडाली. त्यातून पुन्हा हाणामारी झाली. यावेळी सुगंधा श्रीधर राणे व चिराग भगवान राणे यांनी काठ्यांनी संतोष याच्या डोक्यात व कपाळावर प्रहार केला. तसेच एकनाथ राणे यांना भगवान राणे, भाग्यश्री राणे, सुगंधा राणे यांनी काठीने मारहाण केली. तसेच महेश मनोहर राणे यांना भगवान राणे यांनी दुखापत केली. याप्रकरणी पाेलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तर शैलेश श्रीधर राणे (४०) यांनी परस्परविराेधी फिर्याद दाखल केली आहे. मांडावर झालेल्या वादानंतर मी व माझा पुतण्या रोशन घरी जात असताना एकनाथ राणे यांनी बोलावून जाब विचारला व गालावर मारले. त्यावेळी तेथे असलेले महेश मनोहर राणे, संतोष सीताराम राणे, प्रमोद विष्णू राणे यांनी शिवीगाळ केली.

तर महेश याने हातातील काठीने शैलेशच्या डोक्यावर व डाव्या हाताच्या खांद्यावर मारले. त्यावेळी पुतण्या रोशन सोडवण्यासाठी पुढे आला त्यालाही मारहाण केली. यावेळी शैलेश याचा भाऊ भगवान, भावजय भाग्यश्री, पुतण्या चिराग, आई सुगंधा हे घराकडून मांडावर जात हाेते. त्यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, हेडकाॅन्स्टेबल अरविंद कांबळे, राजेंद्र कांबळे, प्रमिला गुरव, चालक दिगंबर पुजारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या मारहाणीत जखमी झालेल्या ८ जणांवर लांजा येथे उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी