शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आयशर टेम्पोने ठोकरले, रस्ते कामगार मजुरांच्या दोन चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 19:45 IST

अपघातात मृत झालेली चिमुकली बाकाळे येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजुरांची मुले असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची नावे समजू शकली नाहीत.

राजापूर : राजापूर तालुक्यातील बाकाळे येथे सागरी महामार्गावर टेम्पोने ठोकरल्याने दोन लहान मुलांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. ही घटना आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. बाकाळे येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजुरांची ही मुले असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची नावे समजू शकली नाहीत. याच अपघातात अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.सागरी महामार्गावरून जैतापूरकडून देवगडकडे जाणाऱ्या एका आयशर टेम्पोने बाकाळे येथील तीव्र वळणावर तीन ते चार जणांना ठोकरल्याची घटना घडली आहे. यामध्ये १२ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर पाच वर्षांच्या एका गंभीर जखमी मुलीचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.अपघातस्थळापासून काही अंतरावरच टेम्पो सोडून चालक पसार झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ नाटे सागरी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. अपघातग्रस्त टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात