शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

Ratnagiri: डेरवणात सापडले दोन बांगलादेशी तरूण, सावर्डे पोलिसांची कारवाई

By संदीप बांद्रे | Updated: November 8, 2023 18:38 IST

चिपळूण : काही दिवसांपूर्वी तीन बांगलादेशीना रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी पथकाने खेर्डी येथून अटक केली होती. त्यापाठोपाठ डेरवण येथे आणखी ...

चिपळूण : काही दिवसांपूर्वी तीन बांगलादेशीना रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी पथकाने खेर्डी येथून अटक केली होती. त्यापाठोपाठ डेरवण येथे आणखी दोन बांगलादेशी तरूण सापडले असून बुधवारी सकाळी सावर्डे पोलिसांनी त्यांना अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्यांची तत्काळ चौकशी सुरू केली आहे.मुश्ताक महमंद शेख (३९,) शाहिन वहिब गाझी (२६, दोघेही बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही दोन महिन्यांपासून डेरवण येथे वास्तव्याला होते. बिगारी कामगार म्हणून ते सावर्डे परिसरात काम करत आहेत. जिथे ते कामाला होते, तिथेच ते राहत होते. या दोघांविषयी सावर्डे पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड व अन्य सहकाऱ्यांनी तत्काळ डेरवण येथे जाऊन या दोघांना ताब्यात घेत अटक केली. या दोघांकडून काही कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. आज, बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हे दोघेजण भारतात कधी व कोणत्या मार्गाने आले, ते किती वर्षे येथे वास्तव्य करित आहेत, त्यांच्या येण्याचा हेतू काय, आदी बाबींची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.      काही दिवसांपूर्वीच खेर्डी मोहल्ला येथून तिघा बांगलादेशींना रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. बुल्लू हुसेन मुल्ला, जलानी बुल्लू मुल्ला, जॉनी बुल्लू मुल्ला अशी त्यांची नावे होती. भारतात घुसखोरी  केल्यानंतर हे तिघेही सुरवातीला नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दोन-अडीच वर्षे वास्तव्याला होते. त्यानंतर ते खेर्डी येथे राहण्यास आले होते. त्याठिकाणी देखील ते 7-8 वर्षे वास्तव्यास होते. या तिघांविषयी न्यायालयीन प्रक्रीया सुरू असताना आणखी दोघे बांगलादेशी तरूण सापडल्याने चिपळुणात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस