मंडणगड हद्दीत अडीच हजार किलो गोवंश मांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST2021-03-31T04:31:45+5:302021-03-31T04:31:45+5:30
दापोली / मंडणगड : दापोली तालुक्यातील वलोते गावातून गोवंश मांस मुंबईकडे घेऊन जाणारी गाडी दापोली कस्टम विभागाने सोमवारी ...

मंडणगड हद्दीत अडीच हजार किलो गोवंश मांस जप्त
दापोली / मंडणगड :
दापोली तालुक्यातील वलोते गावातून गोवंश मांस मुंबईकडे घेऊन जाणारी गाडी दापोली कस्टम विभागाने सोमवारी रात्री १२.३० वाजता गस्त घालताना पकडली असून, अडीच टन गोवंश मांस, हत्यारांसह मुंबई कुर्ला येथील सैफ कुरेशी व इरफान कुरेशी यांना रंगेहात पकडले आहे.
दापोली कस्टम विभागाचे भरारी पथक गस्त घालत असताना एक महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी त्यांना संशयास्पद वाटली. त्यांनी या गाडीचा पाठलाग करून दापोली - मंडणगड मार्गावर वलोते कुंबळे येथे पकडली. या गाडीत अडीच टन गोवंश मांस व हत्यारे होती. या गाडीतील मुंबईतील दोन व्यक्तिंना पकडून पुढील करवाईसाठी मंडणगड़ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दापोली कस्टम विभागाचे अधिकारी जे. एम. भोईटे हे आपले सहकारी महेश यादव, भास्कर गायकवाड, विकास आनंद, अमर मौर्य, सुहास वेलणकर, प्रसन्न शिवणकर, अमित वाडकर, अजिंक्य शिंगारे, अरुण शिगवण, दिलीप जालगावकर, उदय कदम, प्रतीक अहिवळे यांच्यासह दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांच्या हद्दीवर सोमवारी रात्री गस्त घालत होते. त्यांना रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईकडे वेगाने जाणारी महेंद्र बोलेरो पिकअप जीप दिसली. या गाडीतून रक्तमिश्रित पाणी खाली पडत होते व घाण वास येत होता. याचा त्यांना संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवली व गाडीचा मागील भाग उघडून पाहिला. या गाडीमध्ये त्यांना सुमारे अडीच हजार किलो मांस असल्याचे आढळून आले .
याप्रकरणी त्यांनी मुंबई कुर्ला येथील गाडी चालक सैफ कुरेशी व त्याचा सहकारी इरफान कुरेशी यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीमध्ये दहा ते बारा बैल व दोन ते तीन म्हशींची कत्तल केलेले मांस भरलेले होते. हे मांस मुंबई कुर्ला येथे घेऊन जात होते. ते त्यांनी गावातील मुनाफ नावाच्या व्यक्ती कडून विकत घेतले होते व ते कुर्ला येथे इमरान या व्यक्तिला देणार होते.
त्यांनी वापरलेल्या २ कुऱ्हाडी, ४ चाकू, ३ कानस व चाकूला धार लावायचे दोन दगडदेखील जप्त केलेले आहेत.
या सर्व गोष्टी दापोली येथे आणून पंचनामा करण्यात आला. या दोघांसह सर्व मुद्देमाल मंडणगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तेथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
...............................
फोटो आहे.