शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Ratnagiri: वडिलांचा मृतदेह घरात ठेवून 'त्या' दोघी परीक्षेला, संगमेश्वर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:54 IST

रात्रभर वडिलांच्या मृतदेहाजवळच

मिलिंद चव्हाणआरवली : दहावीची परीक्षा सुरू असतानाच वडिलांचे शुक्रवारी (२२ मार्च) रात्री आकस्मिक निधन झाले. दुसऱ्या दिवशी इतिहासाचा पेपर हाेता. एकीकडे दु:खाचा डाेंगर हाेता तर दुसरीकडे शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा हाेता. अचानक समाेर आलेल्या या संकटाने दाेघीही हादरल्या. तरीही घरात वडिलांचा मृतदेह ठेवून दाेघींनी दुसऱ्या दिवशी परीक्षाही दिली. ही घटना रांगव कुंभारवाडी (ता. संगमेश्वर) येथील आहे.

तन्वी व जान्हवी दीपक कुंभार या जुळ्या बहिणी दहावीला आहेत. इतिहासाचा पेपर असल्याने दोघी २२ राेजी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होत्या. अभ्यास पूर्ण होताच झोपण्याची तयारी सुरू असतानाच वडील दीपक कुंभार (४२) यांच्या छातीत दुखू लागले, त्यांना श्वास घ्यायला अडचण येऊ लागली. इतरांच्या मदतीने रात्रीच त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्याेत मालवली आणि दाेघींसमाेर संकट उभे राहिले.वाडीतील काही जाणकार मंडळींनी त्यांना विश्वासात घेऊन पेपरला जाण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी केली. काकी व इतर व्यक्तींना सोबत घेऊन त्या कडवईतील भाईशा घोसाळकर हायस्कूल केंद्रावर परीक्षेसाठी आल्या. डोळ्यातले पाणी थांबत नव्हते, रडून आवाज क्षीण झाला होता. अशा मन:स्थितीत चार किलोमीटर प्रवास करून त्यांनी इतिहासाचा पेपर दिला.

रात्रभर वडिलांच्या मृतदेहाजवळचरात्रभर वडिलांच्या मृतदेहाजवळ बसून त्या रडत होत्या. रात्र संपली दिवस उजाडला मात्र इतिहासाचा पेपर आणि घरी वडिलांचा मृतदेह या द्विधा मन:स्थितीत मुली वडिलांना सोडण्यास तयार नव्हत्या. आपले वडील कधीच आपल्याला दिसणार नाहीत की सोबत असणार नाहीत, त्यांचा आधार आता कायमचाच निघून जाणार, या अस्वस्थ भावनेने दाेघींनी टाहो फोडला.

मिळेत ते काम, देतील ते दामघरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व हालाखीची आहे. नावालाच जमीन असल्याने उत्पन्नापेक्षा कसायला खर्च जास्त असल्याने शेती सोडली. त्यामुळे मिळेल ते काम आणि देतील ते दाम या न्यायाने वडील काम करून आपला संसार चालवत होते. मिळवणारा हात एक, मात्र कुटुंबात सात जण, त्यातच चार मुली, आई सोबत पत्नीची साथ होती.

माेठ्या मुलीने शिक्षण साेडलेमुलींच्या शिक्षणाच्या खर्चाबरोबर कुटुंब सांभाळताना वडिलांना तारेवरची कसरत करावी लागत हाेती. त्यामुळे मोठ्या मुलीने शिक्षण अर्धवट सोडून तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी धरली. तर लहान मुलगी आठवीला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीssc examदहावी