शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत आढळले वीस जिवंत गावठी बॉम्ब, सापळा रचून पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या

By मनोज मुळ्ये | Updated: June 16, 2023 18:10 IST

या प्रकरणाचा अधिक तपास पाेलिस करत आहेत

शिवाजी गोरेदापोली : जंगलातील शिकारीसाठी बनविण्यात आलेले गावठी बाॅम्ब विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला दापाेली पाेलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईत पाेलिसांनी २० जिवंत गावठी बाॅम्ब जप्त केले असून, एकाला अटक केली आहे. रमेश वसंत पवार (५०, रा. जामगे, नवानगर ता. दापोली) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई १५ जून राेजी सायंकाळी ४:१५ वाजता पालगड तिठा (ता. दापाेली) येथे करण्यात आली.पालगड तिठा येथे एक व्यक्ती गावठी बॉम्ब विक्री करिता घेऊन येणार असल्याची माहिती खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अंगरक्षक पोलिस कॉन्स्टेबल रमेश तुकाराम बांगर यांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली पोलिस पथक तयार करण्यात आले. पालगड तिठ्याच्या १०० मीटर अंतरावरील शिवराज ढाबानजीक सापळा रचण्यात आला.सुमारे अर्ध्या तासानंतर एक व्यक्ती एका दुचाकीवरून आली व रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. त्याचा या पथकाला संशय आल्याने त्याला पकडले.त्याची चाैकशी करून त्याची व त्याच्या गाडीची झडती घेतली असता डीकीमध्ये एक पिवळ्या रंगाची पिशवी मिळाली. त्या पिशवीमध्ये एका प्लास्टिकच्या निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये एकूण २० खाकी रंगाचे गावठी बॉम्ब सदृश्य स्फोटक पदार्थ मिळाले. त्याच्याकडून पाेलिसांनी २० गावठी बॉम्ब सदृश्य स्फोटक पदार्थासह एकूण ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्याच्यावर दापोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पाेलिस करत आहेत.ही कारवाई बाणकाेट सागरी पाेलिस स्थानकाचे पाेलिस काॅन्स्टेबल रमेश बांगर, हेडकॉन्स्टेबल एम. एच. केतकर, पाेलिस काॅन्स्टेबल व्ही. आर. पाटील, मंडणगडचे पाेलिस काॅन्स्टेबल एस. आर. घाडगे यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस