कुंबळे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने साकारली हळद रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:31 IST2021-04-18T04:31:16+5:302021-04-18T04:31:16+5:30

मंडणगड : तालुक्यातील कुंबळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन कृषी विभागाच्या मदतीने हळद लागवडीसाठी रोपवाटिका तयार करण्यात आल्याची माहिती सरपंच किशोर ...

Turmeric Nursery started with the initiative of Kumble Gram Panchayat | कुंबळे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने साकारली हळद रोपवाटिका

कुंबळे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने साकारली हळद रोपवाटिका

मंडणगड : तालुक्यातील कुंबळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन कृषी विभागाच्या मदतीने हळद लागवडीसाठी रोपवाटिका तयार करण्यात आल्याची माहिती सरपंच किशोर दळवी यांनी दिली आहे. या उपक्रमात गावातील महिला बचतगट पन्नास हजार रोपांची निर्मिती करणार आहेत.

सरपंच किशोर दळवी यांच्या नियोजनाखाली ग्रामपंचायतीने मोबाइल तंत्रज्ञानाचा अंगीकार करत, स्मार्ट ग्राम ॲपची निर्मिती करून गावातील विकास कामे पूर्ण केली आहेत. ग्रामपंचायतीने राबविलेल्या अनेक उपक्रमात आता हळद लागवड रोपवाटिकेची भर पडली आहे. कुंबळे गावामध्ये हळदीची रोपे तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी सरपंच ग्रामसेवक व कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती लाभली.

.................................

मंडणगड तालुक्यातील कुंबळे येथे हळद लागवड रोपवाटिकेच्या कामाचा शुभारंभ सरपंच किशोर दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Turmeric Nursery started with the initiative of Kumble Gram Panchayat