शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Accident: परशुराम घाटात एसटी बसला पाठिमागून टँकरची धडक; वेळ चांगली, अन्यथा..

By संदीप बांद्रे | Updated: August 26, 2022 17:03 IST

चौपदरीकरणा अंतर्गत या वळणाच्या ठिकाणी अंडरपास मार्ग उभारला जात आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली आहे. परंतू हा रस्ता अतिशय तीव्र उताराचा असल्याने येथे नियमीत अपघात घडत आहेत.

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एसटी बसला पाठिमागून टँकरने धडक दिली. यात एसटी बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडली. यात दोन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये तब्बल ६४ प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने एसटी बस रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडल्याने अनर्थ टळला. अन्यथा उजव्या बाजूला दरीचा मोठा धोका होता. आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी प्रवाशांना कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.चिपळूण आगारातील एसटी बस खेडहून चिपळूणला येत असताना परशुराम घाट माथ्यावरील अवघड वळणावर आली आली असता हा अपघात घडला. चौपदरीकरणा अंतर्गत या वळणाच्या ठिकाणी अंडरपास मार्ग उभारला जात आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली आहे. परंतू हा रस्ता अतिशय तीव्र उताराचा असल्याने येथे नियमीत अपघात घडत आहेत.याआधी या वळणावरच दोन मालवाहू ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर किरकोळ अपघाताच्या घटनाही येथे घडत आहेत. त्यातच चिपळूण आगाराच्या एसटी बसला मागून टँकरची मागून धडक बसून अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच आगारप्रमुख रणजीत राजेशिर्के यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुपारच्या वेळेत खेड मार्गावर बस फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची नेहमी गर्दी असते. बसमध्ये ६४ प्रवासी प्रवास करीत होते. या सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढून अन्य बसच्या साह्याने चिपळूण आगारात आणण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देऊन क्रेनच्या साह्याने एसटी बस बाहेर काढण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात