शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

ट्रकची चार वाहनांना धडक, एक ठार, हातखंबा येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 1:31 PM

accident, truck, car, ratnagirinews कोल्हापूर येथून रत्नागिरीत साखर घेऊन येणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने तीन दुचाकी आणि एका कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला़ तर १० जण जखमी झाले़. हा अपघात रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे झाला़. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देट्रकची चार वाहनांना धडक, एक ठार, हातखंबा येथील घटन, १० जण जखमी

रत्नागिरी : कोल्हापूर येथून रत्नागिरीत साखर घेऊन येणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने तीन दुचाकी आणि एका कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला़ तर १० जण जखमी झाले़. हा अपघात रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे झाला़. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.या अपघातात ठार चालेल्या दुचाकी चालकाचे नांव सतीश कोंडीबा डांगरे (४०, रा. गणेशनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे आहे. ट्रक चालक अजिजुल्लाह असेमोहम्मद (३६, रा. संत कबीरनगर, उत्तरप्रदेश) हा साखर घेऊन (एमएच०८-डब्ल्यू-३९४५) कोल्हापूर ते रत्नागिरी असा घेऊन येत होता. हातखंबा पुलावर गाडी आली असता ट्रकवरील ताबा सुटल्याने कोल्हापूर-गणपतीपुळे येथे निघालेल्या तीन दुचाकी आणि एका कारला एका पाठोपाठ एक धडक दिली.या अपघातात तिन्ही दुचाकींवर प्रत्येकी तीनजण बसून प्रवास करत होते. अपघातात मृत्यू झालेले सतीश डांगरे यांची पत्नी जयश्री डांगरे (३५), मुलगी ऋतुजा सतीश डांगरे (१५) हे प्रवास करत होते. तर अन्य एका दुचाकीवर दुचाकी चालक सोमनाथ कोंडिबा डांगरे (४२), अर्पिता सोमनाथ डांगरे (१५), शुभांगी डांगरे (४०), तर तिसऱ्या दुचाकीचा चालक श्रीशल राजू डांगरे (२१), शोभा राजू डांगरे (५१), प्रिया राजू डांगरे (२३) हे प्रवास करत होते.हातखंबा बाजारपेठेत भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला आणि ट्रकने मारूतीझेन कारला पाठीमागून ठोकर दिली. त्यात कारचालक प्रदीप बाळकृष्ण पटवर्धन (३४, रा. कासारवेली, रत्नागिरी) व त्यांचे वडील बाळकृष्ण पटवर्धन (७२) हे जखमी झाले़. त्यानंतर ट्रकने तीन दुचाकींना धडक देऊन अपघात केला. या अपघातात तीन दुचाकी, कार आणि त्या ट्रकचे नुकसान झाले़ अपघातानंतर सर्व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हातखंबा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली.पर्यटनासाठी दुचाकीवरूनपर्यटनस्थळ खुली झाल्याने अनेकजण कोकणात दाखल होत आहेत. इचलकरंजी येथील डांगरे कुटुंबिय दुचाकीवरून गणपतीपुळे येथे चालले होते. मात्र, साखर घेऊन येणारा ट्रक त्यांच्यासाठी काळ बनून आला. या अपघातामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी