शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात शॉर्ट सर्किटने ट्रकला भीषण आग, ट्रकमधून उडी घेत चालकाने जीव वाचवला

By संदीप बांद्रे | Updated: October 5, 2023 18:38 IST

ट्रकमध्ये फोम शीट व कापूस खचाखच भरला होता

चिपळूण : शहरातील स्वामी मठ रस्त्यावर असलेल्या सर्व्हिस वायरला ट्रकच्या छताचा स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट झाले. त्यातून ट्रकातील कापूस व फोम शीटच्या मालाला अचानक आग लागली. या आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले आणि ट्रकमधील संपुर्ण माल जळून खाक झाला. गुरूवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्नीशमक दलासह पोलिस व नागरिकांनी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.चिपळूण रेल्वे स्थानक नजिकच्या गोडावून मधून गादीसाठी लागणारा कापूस व फोम शीट या ट्रकातून शहरातील काविळतळी येथे आणण्यात येत होते. त्यासाठी मुरादपूर स्वामी मठ रस्त्याने हा ट्रक निघाला होता. पवनतलावाच्या ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व्हिस वायरला ट्रकचा छताचा भाग चिटकला. त्यातून शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रकमधील मालाला आग लागली. क्षणातच आगीचा मोठ्या प्रमाणात भडका उडाला.ट्रकमध्ये फोम शीट व कापूस खचाखच भरलेला होता. त्यामुळे आग क्षणाक्षणाला वाढत होती.  या आगीने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे अनेकांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. तसेच तत्काळ नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्याप्रमाणे अग्नीशामक बंब सोबत पाण्याचा एक टॅंकर घटनास्थळी दाखल झाला. एकाचवेळी दोन पाईप द्ववारे पाण्याचा मारा करण्यात आला. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. अखेर अर्ध्या तासानंतर ही आग नियंत्रणात आली. यावेळी काही तरूणांनी बांबूच्या सहायाने ट्रकातील माल ढकलून नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न केले. तोवर बहुतांशी माल जळून खाक झाला होता. संबंधीत ट्रक अल्ताफ इब्राहिम शेख यांच्या मालकीचा असून चालक नुराज शाह हा ट्रक घेऊन जात होता. आग लागल्याने ट्रकमधून उडी घेत चालकाने जीव वाचवला. या घटनेचा पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून याबाबत महावितरणकडे देखील संपर्क साधण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग