शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाटात ड्रम नेणारा ट्रक उलटला; चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 15:29 IST

Accidenet Ratnagiri : रसायन भरलेले ड्रम घेऊन मुंबईहुन गोव्याच्या दिशेने घेऊन जाणारा ट्रक चालकाचा ताबा सुटून उलटल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शुक्रवारी (दि. २१ रोजी) सकाळी ८.१५ वाजता घाटातील कशेडी आंबा येथे घडली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे.

ठळक मुद्देकशेडी घाटात ड्रम नेणारा ट्रक उलटलाअपघातात ट्रक चालक जखमी

खेड : रसायन भरलेले ड्रम घेऊन मुंबईहुन गोव्याच्या दिशेने घेऊन जाणारा ट्रक चालकाचा ताबा सुटून उलटल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शुक्रवारी (दि. २१ रोजी) सकाळी ८.१५ वाजता घाटातील कशेडी आंबा येथे घडली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते गोवा जाणारा ट्रक (एमएच ०६, बीडब्लू ०२१५) चालक सुरज चंद्रकांत शेडगे (३०, रा. भांडुप, कोकण नगर) हा ट्रकमध्ये कपडे बनविण्याचे क्रॉस आर-४००, कॉलॉरीन -६०० व दिस्पेर-एक्स या रसायनाने भरलेले ड्रम घेऊन जात गोव्याकडे जात होता. कशेडी घाटात आंबा स्टॉपजवळ एका अवघड वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूस उलटला.अपघातामध्ये ट्रकमधील रसायनाचे ड्रम खाली पडून फुटल्याने रसायन रस्त्यावर पसरले होते. मात्र, हे रसायन ज्वलनशील अथवा घातक नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ या अपघाताची माहिती समजतात कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

अपघातामध्ये चालक सुरज शेडगे याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली असून, त्याला कळंबणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ट्रक रस्त्याच्या बाजूला पडल्याने वाहतुकीला कोणताच अडथळा झालेला नव्हता. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी