लांजा : ट्रक आणि बोलेरो पिकप या दोन वाहनांत समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बोलेरो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या दरम्याने मुंबई-गोवा महामार्गावर लांजा नर्सिंग क्वार्टर्स येथे घडली. जखमी चालकाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मालवण ते रत्नागिरी ट्रक चालक गणेश नीळकंठ खोटे (४९, रा. नाचणे, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक (एमएच ०८, डब्ल्यू ८६७७) तर मुंबई ते देवगड बोलेरो चालक आकाशकुमार शंकर गौंडा बुध्दीहाल (२०, सध्या रा. सिंधुदुर्ग, मूळगाव कर्नाटक) हा आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप क्रमांक (एमएच ०४, केएफ ७९५२) ही चुकीच्या दिशेने समोरून येणाऱ्या ट्रक वर जाऊन आदळली. शुक्रवारी सायंकाळी ४.४५ मिनिटांचा दरम्याने मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरातील नर्सिंग क्वार्टर्स जवळ हा अपघात घडला.या अपघातात बोलेरो पिकअप चालक आकाशकुमार बुध्दीहाल हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ट्रक - बोलेरा पिकपच्या अपघातात चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 12:18 IST
Accident Ratnagiri : ट्रक आणि बोलेरो पिकप या दोन वाहनांत समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बोलेरो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या दरम्याने मुंबई-गोवा महामार्गावर लांजा नर्सिंग क्वार्टर्स येथे घडली. जखमी चालकाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रक - बोलेरा पिकपच्या अपघातात चालक जखमी
ठळक मुद्देट्रक - बोलेरा पिकपच्या अपघातात चालक जखमीचालक अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात