शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

..अन्यथा कार्यालयातच घुसू; बोगस आदिवासींविरोधात दापोलीत आदिवासींचा आवाज गर्जला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 18:51 IST

'आम्हाला काही झाले तरी चालेल, आम्ही आमचा जीव द्यायलाही तयार'

शिवाजी गोरेदापोली : बोगस आदिवासींना नोकरीवरून काढा, सेवा संरक्षण देऊ नका, खोट्या जात प्रमाणपत्रधारकांवर गुन्हा दाखल करा व मूळ आदिवासी उमेदवारांना नोकरीवर घ्या, स्थानिक आदिवासी उमेदवारांना नोकरीत प्राधान्य द्या, या मागणीसाठी बिरसा फायटर्स जिल्हा रत्नागिरी व आदिम आदिवासी कातकरी संघटनेने दापोलीत आक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन केले.आझाद मैदान दापोलीपासून मोर्चाला सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे हा मोर्चा काढण्यात आहे. दापोली पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले. तहसीलदार वैशाली पाटील यांनी मागण्या समजून घेतल्या व तुमच्या मागण्या शासनदरबारी वरिष्ठांपर्यंत पोहोचवते, असे आश्वासन दिले.नगरपंचायत दापोलीमार्गे बुरोंडी नाक्यावरून कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय गेटसमोर मोर्चा नेण्यात आला. तेथे आदिवासी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. ठिय्या आंदोलन सुरू होताच कोकण कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी व कुलसचिव आंदोलनस्थळी आले. विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी, कुलसचिव व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने आंदोलन थांबवण्याची विनंती केली. परंतु आंदोलनकर्ता महिला आदिवासींनी अधिकाऱ्यांना दम भरला. आता आम्ही रस्त्यावरून व गेटवरून परत जातोय, मागण्या पूर्ण न झाल्यास कार्यालयातच घुसू, मग आम्हाला काही झाले तरी चालेल, आम्ही आमचा जीव द्यायलाही तयार आहोत, असे सांगितले.बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली हा माेर्चा काढण्यात आला. या मोर्चात बिरसा फायटर्सचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत निकम, कार्याध्यक्ष संदीप पवार, राज्य महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार, चिपळूण तालुकाध्यक्ष सुरेश पवार, सचिव अक्षय निकम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम जाधव, आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे चंद्रकांत जाधव, दापोली तालुकाध्यक्ष विठोबा जगताप आदीसह महिला सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी