माळीणसारख्या आजारांवर वृक्ष लागवडीचे औषध

By Admin | Updated: August 8, 2014 00:42 IST2014-08-07T21:32:32+5:302014-08-08T00:42:37+5:30

राजश्री कीर : निसर्ग संवर्धन हे नागरिकांचे कर्तव्यच

Tree Planting on Diseases like Maline | माळीणसारख्या आजारांवर वृक्ष लागवडीचे औषध

माळीणसारख्या आजारांवर वृक्ष लागवडीचे औषध

चिपळूण : माळीणसारख्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. वन खात्याने शासकीय उपक्रमासाठी जी झाडे तोडायला परवानगी दिली त्या ठिकाणी दुसरी झाडे लावत असताना विशेष आनंद होत आहे. निसर्ग संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत वनपाल राजश्री कीर यांनी व्यक्त
केले. चिपळूणचे परिक्षेत्र वन अधिकारी बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर परिमंडलात वनमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पालपेणे देवघर हायस्कूल व शिवणे येथे गुहागरच्या वनपाल राजश्री कीर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी वनरक्षक गावडे, डाफळे, पंचायत समिती सदस्य सुनील जाधव, परिसरातील सरपंच, उपसरपंच, कृषी अधिकारी, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीसपाटील उपस्थित होते. यावेळी राजश्री कीर यांनी वनसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
२०११-१२ मध्ये गेल इंडिया लि. या कंपनीने गुहागर तालुक्यातील घरटवाडी वेलदूर, साखरी बुद्रुक, शिगवणवाडी, पालपेणे, कुंभारवाडी, भातगाव, तिसंग, तळ्याचीवाडी, पांगारीतर्फे वेळंब, गोणबरेवाडी, काजुर्ली, वेळंब, शिवणे निवातेवाडी या गावातून २०१२-१३ मध्ये मळण, कोतळूक, शृंगारतळी, शीर बुद्रुक, कावतकरवाडी व चिपळूण तालुक्यातील तोंडली या गावातून गॅस पाईपलाईन टाकताना २०११-१२ मध्ये ५ हजार ९४५ व २०१२-१३ मध्ये ३५३८ मनाई असलेली झाडे तोडण्यास परवानगी मागितली होती.
ही झाडे तोडण्यात आली होती. त्या बदल्यात वन खात्यातर्फे ही पर्यायी वृक्ष लागवड पूर्ण करण्यात आली. (प्रतिनिधी)

-गुहागर परिमंडलात वनमहोत्सव साजरा.
-मनाई असलेली झाडे तोडण्यास गेल इंडिया कंपनीने मागितली होती वनखात्याकडे परवानगी.
-वन खात्याच्या परवानगीनुसार करण्यात आली वृक्षमतोड.
-वृक्षतोडीनंतर वनखात्यातर्फे करण्यात आली पर्यायी वृक्षलागवड.
-पालपेणे देवघर हायस्कूल व शिवणेत कीर यांच्याहस्ते वृक्षलागवड कार्यक्रम.
-कीर यांनी केले वनसंवर्धनाबाबत मार्गदर्शन.

Web Title: Tree Planting on Diseases like Maline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.