डीबीजे महाविद्यालयातर्फे वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:55+5:302021-07-05T04:19:55+5:30

अडरे : चिपळूण शहरातील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला ...

Tree planting by DBJ College | डीबीजे महाविद्यालयातर्फे वृक्षाराेपण

डीबीजे महाविद्यालयातर्फे वृक्षाराेपण

अडरे : चिपळूण शहरातील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. गवाळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य एल. ए. बिरादार, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एन. एस. तळप उपस्थित हाेते. त्यांच्या हस्ते सीता, अशोक या वनस्पतींची रोपे लावण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार प्रा. स्वप्नील साडविलकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. अरुण जाधव, विभागाचे सदस्य प्रा. प्रेमकुमार शिवगण, प्रा. डी. आर. चव्हाण, प्रा. के. एस. सावरे, प्रा. योगेश आगवेकर, माहीन मुल्ला, सौरभ घोरपडे, आदींनी सहभागी होत वृक्षारोपण केले.

---------------------------

चिपळूण शहरातील डीबीजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा याेजना विभागातर्फे महाविद्यालयाच्या आवारात वृक्षाराेपण करण्यात आले.

Web Title: Tree planting by DBJ College