शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

रत्नागिरी जिल्ह्यात प्रांताधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 15:56 IST

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काम वेगाने सुरू झाले आहे. राजापूर, दापोलीचे उपविभागीय अधिकारी तर रत्नागिरी, खेड, दापोली येथील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. निवडणुकांमुळे त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देराजापूर, दापोली प्रांताधिकारी रत्नागिरी, खेड, दापोलीच्या तहसीलदारांचा समावेश

रत्नागिरी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काम वेगाने सुरू झाले आहे. राजापूर, दापोलीचे उपविभागीय अधिकारी तर रत्नागिरी, खेड, दापोली येथील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. निवडणुकांमुळे त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या बदल्यांमध्ये नाणार प्रकल्पामुळे चर्चेत आलेले उपविभागीय अधिकारी अभय करंगुटकर यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी विनोद गोसावी यांची नियुक्ती झाली आहे. दापोलीचे उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांची नियुक्ती झाली आहे.त्याशिवाय तहसीलदार संवर्गात रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांची बदली तहसीलदार कुडाळ म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रत्नागिरीचे परिचालन अधिकारी शशिकांत जाधव यांची नियुक्ती केली आहे.खेडचे तहसीलदार अमोल कदम यांची बदली मुरबाडच्या तहसीलदारपदी झाली आहे. त्यांच्या जागी पोलादपूरचे तहसीलदार शिवाजी गोविंद जाधव यांची नियुक्ती झाली आहे. दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव यांची बदली रोहा तहसीलदार म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी मालवणचे तहसीलदार समीर घारे रुजू होणार आहेत.त्याशिवाय रत्नागिरीचे रजा राखीव तहसीलदार राजेंद्र बिर्जे यांची बदली सिंधुदुर्ग येथे तहसीलदार- पुनर्वसन म्हणून झाली आहे, तर शेतजमीन व न्यायाधिकार विभागाचे अपर तहसीलदार परीक्षित पाटील यांची बदली मुरुडचे तहसीलदार म्हणून झाली आहे.अतिरिक्त कार्यभारआगामी निवडणुका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातील बहुतांशी अधिकारी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यातच महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने अतिरिक्त कार्यभार देण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने अधिकारी हजर होईपर्यंत अतिरिक्त पदाचा कार्यभार पडणार आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी