जिल्ह्यातील ६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST2021-08-18T04:38:06+5:302021-08-18T04:38:06+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यातील २ पोलीस निरीक्षक व ४ पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या झाल्या आहेत. रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक ...

जिल्ह्यातील ६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
रत्नागिरी : जिल्ह्यातील २ पोलीस निरीक्षक व ४ पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या झाल्या आहेत. रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड व चिपळूण येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ या दोघांची रायगड येथे बदली झाली आहे.
रत्नागिरी येथे पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेल्या ४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक समस बेग, महेश धोंडे, विकास चव्हाण व अस्मिता पाटील या सर्व अधिकाऱ्यांची रायगड येथे बदली करण्यात आली आहे. या सर्व बदली झालेल्या अधिकाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पोलीस निरीक्षकांमध्ये रवींद्र शिंदे, दादासाहेब घुटुकडे आणि सुजाता तानवडे यांची रायगड येथून रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक विनायक माने यांची पालघर येथून रत्नागिरी, हर्षद हिंगे यांची रायगड येथून रत्नागिरी तर गायत्री पाटील व शीतल पाटील यांची सिंधुदुर्ग येथून रत्नागिरी येथे बदली झालेली आहे.