शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कुळांच्या जमिनीत भ्रष्टाचार करणाऱ्या वाटदच्या कोतवालाची बदली, रत्नागिरीचे तहसीलदारांनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 12:16 IST

काेतवालाची जयगड येथे बदली करण्याचे आदेश

रत्नागिरी : वाटद (ता. रत्नागिरी) येथील कोतवाल दीपक लक्ष्मण गमरे यांनी कुळांच्या एकरात नव्हे, काही हेक्टरात जमिनीत भ्रष्टाचार केला आहे. याबाबत त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पाच अर्जदारांसह ३० लोकांच्या सह्या असलेल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे करण्यात आली होती. याबाबत रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी वाटद येथील शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला असून, पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच काेतवालाची जयगड येथे बदली करण्याचे आदेश दिले आहेत.कोतवालांना गावातील जमिनीसंदर्भात अधिकार, अभिलेख, कागदपत्रे सहज उपलब्ध होतात. गावामध्ये कोणत्या कुळाची कुठे वहिवाट आहे; अनेक वेळा प्रत्यक्ष जागेवर कुळाची वहिवाट असूनही त्यांचे नाव सातबाऱ्यावर नमूद करण्याचे राहिलेले असते, याची माहिती कार्यालयातून शोधून त्या ठिकाणी कूळ लावण्यास अर्ज दाखल करून उच्च महसुली अधिकाऱ्यांच्या मदतीने या जमिनी बळकाविण्याचे काम गमरे हे करतात. तसेच या कुळांबाबत माहिती घेण्यास कोणी आल्यास त्यांना जाणीवपूर्वक उलट-सुलट कारणे देऊन त्यांची दिशाभूल करतात, असे आरोप या निवेदनात करण्यात आले होते.अर्जदार हे शेतकरी असून, ते पूर्वापार या जमिनीत भातशेती, नाचणी, काजू, आंबा ही वडिलोपार्जित पारंपरिक शेती करीत आहेत. या ठिकाणी वहिवाट दाखविण्याचा काेतवाल गमरेचा काहीही संबंध नसतानाही त्यांनी येथे जाणीवपूर्वक वहिवाट दाखविली आहे. तक्रारींवर काही सुनावण्या झाल्या असून, पहिला आदेश शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे.तक्रारदार यांचा हक्क अंशत: मंजूर करण्यात आला आहे. तसेच २००५ ला सेवेत दाखल झाल्यानंतर कूळ कायद्याने ज्या मालमत्ता प्राप्त केलेले आहेत. त्या प्राप्त करण्यापूर्वी किंवा विक्री करून घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारे सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतल्याचे दिसत नाही. याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील १९ व ३ नुसार उल्लंघन केल्याचे दिसत असल्याने कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार जाधव यांनी दिले आहेत. तसेच वाटद या गावात त्यांचे हितसंबंध तयार झालेले असल्याने १९५९ मधील तरतुदीनुसार त्यांची बदली जयगडला केली आहे. ७० ब खाली केलेल्या दाव्यांच्या सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी