रेल्वेच्या धडकेत एक जागीच ठार

By Admin | Updated: December 11, 2014 00:34 IST2014-12-11T00:07:07+5:302014-12-11T00:34:07+5:30

माहिती अर्धवटच

The train was hit by a scuffle | रेल्वेच्या धडकेत एक जागीच ठार

रेल्वेच्या धडकेत एक जागीच ठार

रत्नागिरी : रेल्वेची धडक बसल्याने एकजण ठार झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील भोके रेल्वे स्थानकावर आज, बुधवारी दुपारी १़४५ ते २़१० या कालावधीत घडली़ या अपघाताची ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे़
अरुण विठोबा भोसले असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे गावातील मधलीवाडी येथील रहिवासी आहेत. आज, बुधवारी दुपारी भोके स्थानकानजीक मुंबईकडून येणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसची धडक त्यांना बसली. या धडकेने ते रेल्वे रूळावर पडल्याने त्यावरून गाडी गेल्याने त्यांच्या देहाचे दोन तुकडे झाले़
अरुण भोसले यांच्या अपघाताची माहिती मिळताच फणसवळे परिसरात खळबळ उडाली आहे़ त्यानंतर गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली़ (शहर वार्ताहर)


माहिती अर्धवटच
अरुण भोसले हे रूळ ओलांडत होते आणि अपघात घडला की ते जाणीवपूर्वक रेल्वेसमोर गेले ? त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे का? यासारख्या अनेक गोष्टींची माहिती पुढे आलेली नाही. हा प्रकार घडला तेव्हा आसपास कोणीही नसल्याने पोलिसांकडेही रात्रीपर्यंत अर्धवटच माहिती होती.

Web Title: The train was hit by a scuffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.