शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवासी बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 17:44 IST

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वच स्तरावर जोरदार उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र, कोकण रेल्वेला सध्या मोठ्या प्रमाणात परतीसाठी गर्दी दिसून येत आहे. तरी मास्कचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य दिसून येत आहे

ठळक मुद्देरत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवासी बिनधास्तस्थानकावर कोरोना प्रतिबंधासाठी मास्क वापरणाऱ्यांचे प्रमाण नगण्य

रत्नागिरी : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वच स्तरावर जोरदार उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र, कोकण रेल्वेला सध्या मोठ्या प्रमाणात परतीसाठी गर्दी दिसून येत आहे. तरी मास्कचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य दिसून येत आहे.

मंगळवारी कोकण रेल्वेच्यारत्नागिरी स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या तसेच मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी होती. परंतु त्यांच्यामध्ये कोरोना प्रतिबंधाबाबतचे गांभीर्य मात्र दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.कोकणात गेल्या काही दिवसांमध्ये शिमगोत्सव व होलिकोत्सवाची धूम होती. त्यासाठी मुंबई, पुण्यातून कोकणवासीय मोठ्या संख्येने कोकणातील त्यांच्या गावी आले होते. ते आता मुंबई, पुण्याला परतू लागले आहेत. रत्नागिरी तालुका व जिल्ह्यातील अन्य भागांमध्येही मोठ्या प्रमाणात मुंबईकर शिमगा उत्सवासाठी आले होते. रत्नागिरी स्थानकामध्ये गेल्या चार दिवसांपासून परतीच्या प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.तपासणी आवश्यककोकण रेल्वेकडून कोरोनाबाबत रेल्वे प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता कोकण रेल्वेनेही स्थानकात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्याची आवश्यकता असून तशी मागणी केली जात आहे.

रत्नागिरीत अद्याप कोरोना पॉझिटीव रुग्ण आढळलेले नाहीत. काही संशयित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर बाहेरून रत्नागिरीत येणाऱ्यांची तपासणी होणे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक आहे.कोरोना दहशतमुंबई, पुणे व राज्यातील अन्य शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने कोरोनाच्या दहशतीचे वातावण आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे टाळावीत, असे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे. मात्र, त्याचा कोकण रेल्वेच्या प्रवाशांवर परिणाम दिसून झालेला नाही.प्रतिबंधाचे फलकरत्नागिरीसह कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर कोरोना या महामारीचा सामना करण्यासाठी काही सुचना देणारे फलक, पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मास्क वापरण्याचा सल्लाही त्यात आहे. मात्र, रेल्वे स्थानकातील स्थिती पाहता कोरोनाबाबत प्रवाशांना भीती नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीrailwayरेल्वे