शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कोंढेतड येथे चौपदरीकरणाच्या कामात ट्रेलर घुसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:01 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोंढेतड व उन्हाळे चौपदरीकरणाच्या कामात अतिवेगाने जाणारा ट्रेलर रस्ताच्या मध्यभागी घुसल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी दोन तासानंतर वाहतूक सुरळीत

राजापूर : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोंढेतड व उन्हाळे चौपदरीकरणाच्या कामात अतिवेगाने जाणारा ट्रेलर रस्ताच्या मध्यभागी घुसल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी अजूनही सपाटीकरणाचे काम सुरू असून, खोदाईची माती रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली आहे. दरम्यान, कोंढेतड येथे चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच ट्रेलरवरील चालकाच्या निष्काळजीपणामुळे तो चौपदरीकरणाच्या कामातच घुसला. रस्त्याच्या मधोमधच हा ट्रेलर घुसल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.तब्बल दोन तास हा ट्रेलर तसाच रस्त्याच्या मधोमध उभा होता. अखेर ११.३० च्या दरम्याने ट्रेलर बाजूला करण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून वाहनांना सावधानतेचा इशारा देणे गरजेचे आहे.

मात्र, अनेक ठिकाणी हे कर्मचारीच तैनात नसल्याने कामाच्या ठिकाणाहून वेगाने वाहने जाण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ताचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघातRatnagiriरत्नागिरी