शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: भोस्ते घाटात ट्रेलरची तीन वाहनांना धडक, पाचजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 16:43 IST

अपघातानंतर महामार्गावर सगळीकडे तेल पसरल्यामुळे अनेक वाहने घसरुन पडली

हर्षल शिरोडकरखेड : तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावर भोस्ते घाट अपघाताचा प्रवण क्षेत्रच बनत चालले असून, आज, मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रेलरने तीन वाहनांना धडक दिली. या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. खेडमधील भोस्ते घाटातील अवघड वळणावर हा अपघात झाला.या अपघातात ट्रेलर (आरजे १४, क्यूके ७७३३) ने देवरूख - भिवंडी एसटी बस (एमएच १३, सीयू ६५८५), महिंद्रा पिकअप (एमएच ०९, एफएल ४५९१) व दुचाकी अशा तीन वाहनांना धडक दिली आहे. हा ट्रेलर इतका भरधाव वेगात होता की, वाहनांना धडकून हा ट्रेलर संरक्षण भिंतीवर जाऊन आदळला आणि थांबला. ट्रेलरच्या धडकेत एसटी बस, दुचाकी आणि महिंद्रा पिकअप या तीन वाहनांना धडक दिली आहे. हा ट्रक इतका भरधाव वेगात होता यामुळे संरक्षण भिंतीला जोरदार ठोकर देत थांबला.या भीषण अपघातामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खेडमधील लवेल येथील घरडा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातानंतर महामार्गावर सगळीकडे तेल पसरल्यामुळे अनेक वाहने घसरुन पडली. त्यामुळे एक तास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तात्काळ उपाययोजना केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात