पाळंदे समुद्रात पुण्यातील पर्यटक बुडाला

By Admin | Updated: September 10, 2015 00:48 IST2015-09-10T00:45:49+5:302015-09-10T00:48:47+5:30

बुधवारी दुपारी घडली घटना

Tourists in Pune, in the Palande sea | पाळंदे समुद्रात पुण्यातील पर्यटक बुडाला

पाळंदे समुद्रात पुण्यातील पर्यटक बुडाला

दापोली : तालुक्यातील पाळंदे येथील समुद्रात पुण्यातील पर्यटक बुडाला असून, त्याचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
सागर साळुंखे (२८, धनकवडी, पुणे) असे या तरूणाचे नाव आहे. त्याच्यासह त्याचे सहा मित्र दापोलीत मंगळवारी आले होते. ते पाळंदे येथे थांबले होते. एक दिवस मौजमजा केल्यानंतर व परिसरात फेरफटका मारल्यानंतर बुधवारी दुपारी ते स्नानासाठी समुद्रात उतरले. त्यावेळी सागर हा समुद्रात बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला ओढून पाण्याबाहेर काढले आणि तत्काळ दवाखान्यात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सागर हा चालकाचा व्यवसाय करतो. अधिक तपास पोलीस करत आहेत. (वार्ताहर)
 

Web Title: Tourists in Pune, in the Palande sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.