शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन झालं, पण पुण्यात पाऊल ठेवेपर्यंत धाकधूक, श्रीनगरला गेलेल्या रत्नागिरीच्या कुलकर्णी दाम्पत्याचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:34 IST

शोभना कांबळे रत्नागिरी : जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. मात्र, परतीच्या प्रवासात ...

शोभना कांबळेरत्नागिरी : जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. मात्र, परतीच्या प्रवासात विमानतळावरच पहलगाम येथील बैसरन खोरे परिसरात झालेल्या दहशतवादी जीवघेण्या हल्ल्याची बातमी कळली आणि त्यानंतर सर्व प्रवास सुखाचा झाला तरीही पुण्याच्या भूमीवर पाय ठेवेपर्यंत धाकधूक कायम होती, अशा शब्दात रत्नागिरीतील अभ्युदय नगर भागातील रहिवासी पद्मजा कुलकर्णी यांनी आपला अनुभव सांगितला. बुधवारी सकाळी पुण्यात आल्यानंतर त्यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.पद्मजा कुलकर्णी आणि त्यांचे पती नंदकुमार कुलकर्णी पुण्यातील त्यांच्या नातेवाईकांसोबत श्रीनगर येथे पर्यटनासाठी गेले होते. पुण्यातील ट्रॅव्हल्समधून एकूण ३२ जण यात सहभागी होते. रत्नागिरीतून कुलकर्णी दाम्पत्य आणि पद्मजा कुलकर्णी यांचे पुण्यातील तीन बंधू आणि त्यांच्या पत्नी असे साळसकर परिवारातील सहा मिळून एकूण आठ जण १६ एप्रिल रोजी श्रीनगरला पोहोचले. येथील विविध स्थळे पाहून ही सर्व मंडळी रविवार, २० रोजी पहलगामला गेली होती. मात्र, यावेळी काहीच गडबड दिसत नव्हती. सर्वत्र शांत होते. याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कमांडोही होते. त्यामुळे भीतीचा लवलेशही नव्हता. पहलगाम येथील बैसरन पाॅईंट पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक जात असतात. सोमवारी गुलमर्ग पाहून झाल्यावर मंगळवारी दुपारी पुन्हा परतीच्या प्रवासासाठी श्रीनगर येथे विमानतळावर दाखल झालो. जाताना दिल्ली मार्गे विमानाने प्रवास होता तर येताना चंडीगड मार्गे यावे लागणार होते. दुपारी अगदी जेवतानाही पहलगाम हल्ल्याविषयी काहीच माहीत नव्हते. मात्र, श्रीनगर विमानतळावर आल्यावर पहलगाम हल्ल्याची बातमी कळली, त्यात २८ जण गेल्याचे कळले आणि मग आपण घरी सुखरूप पाेहोचू ना? या भीतीने अस्वस्थ केले, असे पद्मजा कुलकर्णी सांगतात.त्यानंतर चंडीगड येथे उतरेपर्यंत त्यांना आपल्या घरच्यांशी कुठल्याही तऱ्हेचा संपर्क होत नव्हता. मात्र, चंडीगड विमानतळावर पोहोचल्यानंतर घरच्यांचे फोन खणाणू लागले. नातेवाईकांनी त्यांचे आवाज ऐकल्यावर आणि सर्व सुखरूप आहेत, हे कळल्यावर हायसे वाटले. अखेर चंडीगडहून पुण्यात रात्री १ वाजता ही सर्व मंडळी पोहोचली आणि घरी सुखरूप आणल्याबद्दल सर्वांनीच ईश्वराचे आभार मानले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन