रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोर, बीचेस गर्दीने फुलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 02:09 PM2019-05-17T14:09:28+5:302019-05-17T14:13:32+5:30

सध्या जिल्ह्यात पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांबरोबरच परिसरातील हॉटेल्स, लॉज सध्या ८५ टक्के आरक्षित झाली असून, हा हंगाम १० जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 Tourism commensurate in Ratnagiri district, beaches thronged | रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोर, बीचेस गर्दीने फुलले 

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोर, बीचेस गर्दीने फुलले 

googlenewsNext
ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोर, बीचेस गर्दीने फुलले हॉटेल्स, लॉज १० जूनपर्यंत फुल्ल, रेल्वे, बसगाड्यांनाही गर्दी

रत्नागिरी : सध्या जिल्ह्यात पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांबरोबरच परिसरातील हॉटेल्स, लॉज सध्या ८५ टक्के आरक्षित झाली असून, हा हंगाम १० जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोकणात हिवाळी आणि उन्हाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढतो. विद्यार्थीवर्गाला दिवाळीची सुटी तशी फारशी नसते. मात्र, उन्हाळी सुटी महिना, दीड महिना असल्याने या कालावधीत बहुतांश लोक कुटुंबासह पर्यटनाला निघतात.
ह्यमार्च एंडिंगह्णच्या धावपळीतून बाहेर पडलेला नोकरदारवर्गही रिलॅक्स होण्यासाठी आठ - दहा दिवसांची सुटी काढून फिरायला बाहेर पडतो. कोकणातील समुद्र किनारे आणि वनराजी पर्यटकांना हापूस आंब्याच्या ओढीने बहुतांश पर्यटक या कालावधीत कोकणात येतात.

सध्या मे महिना सुरु असल्याने रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल झाला आहे. रत्नागिरीतील भगवतीबंदर, भाट्ये, मांडवी किनारा, पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी, आरे-वारे किनारा, गणपतीपुळे, मुरूड - दापोली, गुहागर, वेळणेश्वर आदी पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी गजबजलेली आहेत. त्यामुळे या भागातील हॉटेल्स, लॉज सध्या पर्यटकांनी भरलेली आहेत. पर्यटकांच्या संख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मार्गांवर आता वाहनांची गर्दी दिसू लागली आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची वर्दळ सुरू असते.

या कालावधीत एस. टी. गाड्यांबरोबरच कोकण रेल्वेच्या गाड्यांना गर्दी वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडूनही त्या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गर्दीचा हंगाम पाहता सध्या एस. टी.तून मुंबई प्रवास ४५० रूपयांत होत असताना खासगी गाड्यांना नॉन एसीसाठी ७०० ते ८००, तर एसी गाड्यांना ९०० ते ११००पर्यंत भाडे मोजावे लागत आहे.

गेल्या काही वर्षात रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. यंदा तर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटनाचा हा हंगाम अगदी १० ते १५ जूनपर्यंत राहील, असे मत हॉटेल व्यावसायिक तसेच लॉजधारकांकडून व्यक्त होत आहे.

पर्यटन हंगामात यंदा पर्यटकांची लक्षणीय वाढ झाली आहे. पर्यटकांच्या संख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मार्गांवर आता वाहनांची गर्दी दिसू लागली आहे.

 

दरवर्षी रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. याहीवर्षी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने आताच लॉजचे ८५ टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे. अगदी ८ ते १० जूनपर्यंतचे आरक्षणही आतापासूनच फुल्ल झाले आहे.
- दीपक साळवी,
हॉटेल ग्रार्इंड इन, रत्नागिरी.


 

Web Title:  Tourism commensurate in Ratnagiri district, beaches thronged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.