कापरे येथे काेराेनाबाबत आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST2021-06-29T04:22:09+5:302021-06-29T04:22:09+5:30
चिपळूण : तालुक्यातील कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी २९ जून ...

कापरे येथे काेराेनाबाबत आज बैठक
चिपळूण : तालुक्यातील कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी २९ जून रोजी कापरे येथे बैठक बोलावली आहे. कापरे मधलीवाडी येथील प्रकाश मोरे यांच्या घरी दुपारी ३ वाजता ही बैठक होणार आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि या भागातील खासगी डाॅक्टर्स यांच्यासमवेत चर्चा केली जाणार आहे.
कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यात स्थानिक पातळीवरील आरोग्य अधिकारी तसेच ग्रामस्थांना अपयश आले आहे. त्यामुळे या भागातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे कळल्यानंतर मतदारसंघाचे आमदार जाधव यांनी स्वतःहून पुढाकार घेत या भागातील कोरोनाची साखळी कोणत्याही परिस्थितीत खंडित करण्याचा निर्धार केला आहे. त्याच अनुषंगाने ही बैठक त्यांनी बोलावली आहे.