आजचा दिवस ‘रोड शो’चा
By Admin | Updated: October 12, 2014 00:52 IST2014-10-12T00:46:40+5:302014-10-12T00:52:17+5:30
चिपळूण मतदारसंघ : तिन्ही मोठे पक्ष रस्त्यावर उतरणार

आजचा दिवस ‘रोड शो’चा
चिपळूण : शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे उद्या रविवारी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात चिपळूण बाजारपेठेत ‘रोड शो’ काढण्यात येणार आहे. यासाठी शासकीय परवानगीही घेण्यात आली आहे.
चिपळूण विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचार जोरात सुरू आहे. येथे तुल्यबळ लढत रंगणार असल्याने चारही उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालवला आहे. एवढेच नव्हे तर संधी मिळेल तेथे शक्तीप्रदर्शन करण्यासही सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एकाच दिवशी तीन रोड शो होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोफळी येथील हनुमान व्यायाम शाळा येथे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत प्रचारफेरी काढण्यात येणार आहे तर दुपारी १ ते सायंकाळी ६ या कालावधीत चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ते बाजारपेठ दरम्यान प्रचारफेरी काढण्यात येईल. यावेळी उमेदवार शेखर निकम, माजी आमदार प्रदेशा उपाध्यक्ष रमेश कदम, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, सर्व नगरसेवक, बँकेचे संचालक व विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
शिवसेनेतर्फे सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत मार्कंडी येथील निवडणूक कार्यालयापासून चिंचनाका, बाजारपेठ दरम्यान प्रचार फेरी काढण्यात येईल. यावेळी उमेदवार आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, शहरप्रमुख भगवान शिंदे, महिला आघाडीच्या पदाधिकारी, सर्व नगरसेवक व इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार
आहेत.
शिवसेनेचा नजीकचा प्रतिस्पर्धी असलेल्या भारतीय जनता पक्षातर्फे सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत बाजारपेठेत प्रचारफेरी काढण्यात येणार आहे. यावेळी उमेदवार माधव गवळी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, भाजपाचे महेश दीक्षित, विजय चितळे, बल्लाळ, थत्ते, तुषार गोखले, शहराध्यक्ष वैशाली निमकर, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी गोखले, नारायण चव्हाण, हिरामण गवळी, प्रसाद जोग, आरपीआयचे तालुकाध्यक्ष जी. बी. मोहिते, युवकचे अध्यक्ष उमेश सकपाळ, शहराध्यक्ष मंगेश जाधव, महिला आघाडीच्या स्नेहा जाधव, उत्तम जाधव, युवकचे प्रशांत मोहिते आदी या रॅलीत सहभागी होणार आहेत. काँगे्रसतर्फेही उमेदवार रश्मी कदम, प्रभारी तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे, रामदास राणे, सुरेश राऊत, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, शहराध्यक्ष परिमल भोसले, नगरसेवक कबीर काद्री आदी सहभागी होणार आहेत.
एकूणच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रोड शोव्दारे हे तिन्ही पक्ष आपापली ताकद दाखवून देणार आहेत. प्रचार संपण्यास एक दिवस बाकी राहिला असताना हा रोड शो आयोजित करण्यात आल्याने त्यानिमित्ताने मोठे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या शक्तीप्रदर्शनाकडे चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
४शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे होणार रोड शो.
४चिपळूण विधानसभा मतदारसंघात प्रचार जोरात सुरू.
४एकाच दिवशी तीन रोड शो होणार.
४प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रोड शोव्दारे तिन्ही पक्ष आपापली ताकद दाखवून देणार.
४शक्तीप्रदर्शनाकडे चिपळूणकरांचे लक्ष.
तिन्ही पक्षांनी एकाच दिवशी रोड शोचे आयोजन केले असून त्यामुळे चिपळुणात रंगणार या शक्तीप्रदर्शनाबाबत साऱ्याच चिपळूणकरांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे कोण किती पाण्यात, हे रविवारी दिसून येणार आहे.