त्या तरूणांनी दाखवली समयसूचकता

By Admin | Updated: July 29, 2014 00:00 IST2014-07-28T20:47:44+5:302014-07-29T00:00:57+5:30

आगरोधक उपयोगी : ...अन आगीचे संकट टळले, त्यांचा संसार वाचला

The time shown by the youngsters is the timing | त्या तरूणांनी दाखवली समयसूचकता

त्या तरूणांनी दाखवली समयसूचकता

शृंगारतळी : संकटात धावून येतो तोच खरा मित्र, हा सुविचार येथील नागरिकांनी नुकत्याच येथे घडलेला एका आगीच्या घटनेनंतर खरा करून दाखवला. दोन दिवसांपूर्वी शृृंगारतळी येथील गणेश मोरे यांच्या फ्रीजला पहाटेच्या वेळी आग लागली. आग एवढी भयानक होती की, आणखी पाच-सहा मिनिटे विझविली नसती तर मोरे यांच्या संपूर्ण घराला आगीने वेढले असते. शेजारी कोणी नाही, पहाटेची साखरझोपेची वेळ. मदतीला कोण धाऊन येणार? असा प्रश्न होता. मात्र, मोरे यांच्या घरासमोर विनायक पेट्रोलपंप आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या सुभाष मुढेकर, संतोष शिर्के, योगेश आग्रे या कर्मचाऱ्यांच्या नजरेला त्या आगीची घटना जाणवल्याने मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी पेट्रोलपंपाच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेले आगरोधक यंत्र घेऊन घटनास्थळी धाव घेतली.
खिडकी फोडून त्यांनी रसायन फवारून आग विझवली. त्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला. त्यांच्या या धाडसामुळे मोरे यांचा संसार वाचला आहे. आग क्षणात विझली असली तरी तरूणांचे कार्य मोठे आहे. अशीच दुसरी आगीची घटना गतवर्षी शृृंगारतळी मुख्य बाजारपेठेत घडली होती. एका गॅसशेगडी दुरूस्तीच्या दुकानात शेगडी दुरूस्त करताना पाईप लिकेजमुळे सिलिंडरने आग पकडली. आग आटोक्यात येत नव्हती. सिलिंडरचा स्फोट होण्याच्या भीतीने प्रत्येकजण पळत होता. त्याचवेळी शेजारच्या नितीन फार्माचे मालक नितीन बेलवलकर यांनी आपल्या मेडिकलमधून आगरोधक यंत्र आणून क्षणात आग विझविल्याने बाजारपेठेतील मोठे संकट टळले होते. त्याच्या आठवणी अनेकांच्या मनात ताज्या झाल्या. (वार्ताहर)

-आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याआधीच मोरे यांचा संसार वाचवणाऱ्या मुढेकर, शिर्के यांचे कौतुक.
-आपण केवळ बघ्याची भूमिका घेतो, या प्रथेला तरूणांनी दिला छेद.
-पेट्रोलपंपावर ठेवलेल्या आगरोधक यंत्राबाबतचा निर्णय त्वरित घेतल्याने संकट टळले.
-गतवर्षी लागलेल्या आगीच्या आठवणी ताज्या.

Web Title: The time shown by the youngsters is the timing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.