शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदलामुळे हापूसवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव, फवारणी वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 12:25 IST

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी ...

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. हवामानातील बदलाचा अंदाज घेत दर १० ते १५ दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. कीटकनाशके महागडी असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.देशातीलच नव्हे तर परदेशी नागरिकांना भुरळ घातलेल्या आंबा पिकावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. फयान वादळानंतर जिल्ह्यातील आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसत असून, बागायतदारांची आणि पर्यायाने जिल्ह्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवली. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच आंब्याला मोहोर सुरू झाला. अवकाळी पावसामुळे मोहोरावर परिणाम झाला. काही ठिकाणी मोहोर खराब झाला. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मोहोर मात्र टिकून आहे.

पहिल्या मोहोराचा आंबा पाच ते दहा टक्केच शिल्लक राहिला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सर्वत्र मोहोर चांगला आला आहे. काही ठिकाणी फळधारणा अद्याप व्हायची आहे, तर काही ठिकाणी कणी, तर काही ठिकाणी सुपारी एवढा आंबा झाडावर आहे. हा आंबा मार्चमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यांपूर्वी तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, बागायतदारांनी योग्य उपाययोजना केल्याने तुडतुडा आटोक्यात आणण्यात यश आले होते; परंतु तुडतुड्याचा प्रादुर्भाव वारंवार होत असल्याने शेतकऱ्यांना आटोक्यात आणणे अवघड बनले आहे. वास्तविक प्रत्येक फवारणीत २० ते २५ दिवसांचा फरक असणे आवश्यक आहे. मात्र, कीटकनाशकांचा प्रभाव पडत नसल्याने १० ते १५ दिवसाने फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे.पावसाळी ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य कीडरोगाचा प्रभाव वाढला होता, त्यासाठी उपाययोजना करून कीडरोगावर नियंत्रण आणले आहे; परंतु ढगाळ हवामान, थंडी यामुळे आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. थ्रीप्स आटोक्यात आणण्यासाठी बागायतदारांना महागड्या कीटकनाशकांचा वापर करावा लागत आहे. बाजारात महागडी कीटकनाशके असली तरी थ्रीप्स वेळीच नियंत्रणात येणे गरजेचे आहे. आंब्यावरील कीडरोग, तुडतुडा, थ्रीप्स नियंत्रणासाठी वापराव्या लागणाऱ्या कीटकनाशकांच्या किमती अधिक आहेत. त्यामुळे बागायतदारांसाठी आंबा पीक खर्चिक बनले आहे.

आंबा लागवड क्षेत्र - ६६ हजार ४३३ हेक्टरउत्पादन - एक ते सव्वा लाख टनदरवर्षीची उलाढाल - ७०० ते ८०० कोटी

यावर्षी फुलोरा चांगला असल्याने सध्या तरी समाधानकारक चित्र आहे. आंबा पिकासाठी नीचांक तापमान व अवकाळी पाऊस मात्र धोकादायक ठरणार आहे. सध्या चित्र समाधानकारक असले तरी प्रत्यक्ष फेब्रुवारीत आंब्याचे प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होणार आहे. हवामानातील बदलाचा अंदाज घेत तुडतुडा, कीडरोग, थ्रीप्सपासून रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागत आहेत. - आनंद देसाई, बागायतदार.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान