शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरी जिल्ह्यात साडे तीन हजार दहीहंड्यांचा थरार, गोविंदा पथके सज्ज

By मेहरून नाकाडे | Updated: September 6, 2023 12:49 IST

लाखोंची बक्षिसे जाहीर

रत्नागिरी : जिल्ह्यात दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. गुरूवार दि. ७ सप्टेंबर रोजी दहीकाला उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने जिल्हयात यावर्षी ३०९ सार्वजनिक तर ३०४३ खासगी दहीहंडया उभारण्यात येणार आहेत. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही दहीहंडीसाठी लाखो रूपये किमंतीची बक्षिसे जाहीर केली आहेत. त्यामुळे दहीहंडीचा जल्लोष व पारितोषिके मिळविण्यासाठी मंडळामंडळांमधील चुरस व थरार अनुवयास मिळणार आहे.जिल्ह्यात गतवर्षी (२०२२) २५१ सार्वजनिक तर २३३९ खासगी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या, तर आठ ठिकाणी दहीहंडीनिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. मात्र गतवर्षीपेक्षा यावर्षीच्या दहीहंड्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्हयात उभारण्यात येणाऱ्या विविध शहरातील सात ते आठ थर असणाऱ्या हंड्या फोडण्यासाठी जिल्हयातील पथकांसह जिह्याबाहेरची पथकेही येतात. सध्या दहीहंडयांच्या थरांबरोबर ठेवण्यात आलेल्या बक्षिसांच्या रकमेमध्येही स्पर्धा लागली आहे. दहीहंडीला राजकीय स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध ठिकाणी राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून सिनेकलाकार, वाहिन्यांचे कलाकार, आॅर्केस्ट्रा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक दहीहंडया जयगड, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, मंडणगड, बाणकोट, दाभोळ येथे फोडण्यात येणार आहेत.

जिल्हाभरातील दहीहंड्यांची पोलीस स्थानक निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :पोलीस स्थानके - सार्वजनिक - खासगीरत्नागिरी शहर -   ९   -   ९०रत्नागिरी ग्रामीण  - ०   -  १८२जयगड   - ५९    -  ८१राजापूर  -  ४०   -   ७०नाटे       - ३०   -  ८५देवरुख -  ९    -  ५०सावर्डे    -  २   -  ४५चिपळूण-  १५    - २९०अलोरे    -  ६    -  ३०गुहागर  -   १   -  २२५खेड       - २४  -   ५००दापोली -   ३८   -  ३२७मंडणगड - १९ -   १७९बाणकोट  - १ -   ३८९पूर्णगड   -  १५  -  ३०दाभोळ   -  ४   -  २५७

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDahi Handiदहीहंडी