शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचविले; अहिल्यानगर येथून आले होते देवदर्शन, पर्यटनासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 16:19 IST

समुद्रात लाटांचा जोर अद्यापही कायम

गणपतीपुळे (जि.रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात अंघाेळ करताना बुडणाऱ्या तीन तरुणांना वाचविण्यात स्थानिक जीवरक्षक आणि किनाऱ्यावरील व्यावसायिकांना यश आले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला घडली. हे तीनही तरुण अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत.रामहरी राजपूत (वय २५), किशन वाघमारे (वय ३०) व सुनील जाधव (वय २५) अशी तिघांची नावे आहेत. अहिल्यानगर येथील पाच तरुण गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी व देवदर्शनासाठी आले हाेते. देवदर्शन करून या पाच तरुणांपैकी तिघे जण अंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. गणपतीपुळे येथील समुद्रात लाटांचा जोर अद्यापही कायम आहे. मोठमोठ्या लाटा उसळी घेत असतानाच अचानक हे तरुण खोल पाण्यात ओढले गेले. त्यांना पाण्याबाहेर येणे मुश्कील हाेताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.यावेळी किनाऱ्यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक उमेश म्हादे, अनिकेत चव्हाण यांनी तत्काळ समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिकांना माहिती देऊन समुद्राकडे धाव घेतली. जीवरक्षक उमेश म्हादे व अनिकेत चव्हाण, व्यावसायिक ओंकार शेलार, रूपेश पाटील, गणपतीपुळेचे उपसरपंच संजय माने यांनी समुद्राच्या पाण्यात जाऊन या तिघांना सुखरूपपणे बाहेर काढले.