लांजात एकाच दिवशी तिघे पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:32 IST2021-03-27T04:32:02+5:302021-03-27T04:32:02+5:30

लांजा : तालुक्यातील ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी व्हेळ येथील दोन ...

Three positives on the same day in Lanza | लांजात एकाच दिवशी तिघे पाॅझिटिव्ह

लांजात एकाच दिवशी तिघे पाॅझिटिव्ह

लांजा : तालुक्यातील ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी व्हेळ येथील दोन तर वेरवली खुर्द येथील एकाच दिवशी एकूण तीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

वेरवली खुर्द येथील २४ वर्षीय युवकांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी केली असता पाॅझिटिव्ह आली आहे. तसेच व्हेळ येथील ३२ व ३५ वर्षीय तरुणांची ॲन्टीजेन कोरोना चाचणी केली असता पाॅझिटिव्ह आली आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आहे.

तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ५५७ झाली आहे तर कोरोनावर ५२८ जणांनी यशस्वी मात केली आहे. सध्या तालुक्यात १४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. तर १५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

Web Title: Three positives on the same day in Lanza