शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 14:51 IST

औद्योगिक कंपनीच्या कुंपणावर बसलेला बिबट्या पकडण्यासाठी मदत करणाऱ्या तीन ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत घडला.

ठळक मुद्देबिबट्या पकडण्यासाठी मदत करणाऱ्या तीन ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत घडला.बिबट्या फासकीतून सुटला असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे तो जखमी झाला आहे. पिंजरा सांभाळणारा माणूस घाबरुन स्वतःच पिंजऱ्यात बसला.

शिरगाव (रत्नागिरी) - एका औद्योगिक कंपनीच्या कुंपणावर बसलेला बिबट्या पकडण्यासाठी मदत करणाऱ्या तीन ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत घडला. तिन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या गाणे खडपोलीतील साफयिस्ट कंपनीच्या कुंपणाच्या कठड्यावर बसलेला काही कर्मचाऱ्यांना दिसला. लगेचच हा विषय सगळीकडे पसरला आणि बघ्यांची गर्दी जमली.

बिबट्या फासकीतून सुटला असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे तो जखमी झाला आहे. या प्रकाराची माहिती तातडीने वनविभाला देण्यात आली. वन अधिकारी पत्की व त्यांचे दोन सहकारी घटनास्थळी आले. बिबट्या काही हालचाल न करता शांत बसून होता. मात्र वन खात्याचे लोक त्याला पकडण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत चार ग्रामस्थ होते. एकजण पिंजरा सांभाळत होता. तेव्हा अचानक बिबट्याने झेप घेऊन तीन ग्रामस्थांना जखमी केले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. पिंजरा सांभाळणारा माणूस घाबरुन स्वतःच पिंजऱ्यात बसला. अखेर पिंजरा बाजूला आणून त्याला बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरी