शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जंगली डुकराने केलेल्या हल्ल्यात दापोली तालुक्यातील चांदीवणे येथे ३ जखमी, प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 16:11 IST

जंगली डुकराने केलेल्या हल्ल्यात दापोली तालुक्यातील चांदीवणे येथे कवळ तोडण्यासाठी गेलेले तीनजण जखमी झाले असून, त्यातील दोघांना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एकाला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.सहदेव वामने यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदापोली तालुक्यातील चांदीवणे येथे जंगली डुकराचा हल्ला कवळ तोडण्यासाठी गेलेले तीनजण जखमी वामने यांची प्रकृती गंभीर, खासगी रुग्णालयात दाखल

दापोली : जंगली डुकराने केलेल्या हल्ल्यात दापोली तालुक्यातील चांदीवणे येथे कवळ तोडण्यासाठी गेलेले तीनजण जखमी झाले असून, त्यातील दोघांना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चांदीवणेचे पोलीसपाटील जितेंद्र करमरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चांदीवणे खालचीवाडी परिसरात हरिश्चंद्र किसन तळवटकर (४०), सहदेव दौलत वामने (८०) व त्यांची पत्नी अनुसया वामने (७०) हे तिघे कवळ तोडायला गेले होते.

हरिश्चंद्र तळवटकर एका ठिकाणी कवळ तोडत होते, तर काही अंतरावर सहदेव वामने कवळ तोडत होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कवळ तोडून झाल्यावर त्यांनी कवळ जमा करावयास सुरुवात केली असता एका जंगली डुकराने प्रथम हरिश्चंद्र यांच्यावर हल्ला केला.

हरिश्चंद्र यांनी समयसूचकता दाखवत ते जवळच्या झाडावर चढले. त्यानंतर डुकराने आपला मोर्चा अनुसया यांच्याकडे वळवला व त्यांच्यावर हल्ला केला. अनुसया यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यानंतर अनुसयाही जीव वाचवण्यासाठी जवळच्या एका झाडावर चढल्या. त्यानंतर सहदेव वामने हे कोयती घेऊन डुकराच्या दिशेने धावून गेले. मात्र, डुकराने त्यांच्यावरही हल्ला केला व त्यांचे दोन्ही पाय फाडून टाकले.

या सर्वांची आरडाओरड ऐकून नदीवर असलेल्या गावकऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर या तिघांना दापोली रुग्णालयात आणले. सहदेव वामने यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Dapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणेRatnagiriरत्नागिरी