दळे येथे तीन नेपाळी कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST2021-09-21T04:35:18+5:302021-09-21T04:35:18+5:30

राजापूर : तालुक्यातील दळे येथे एकाच दिवशी तीन नेपाळी कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली ...

Three Nepali workers killed at Dale | दळे येथे तीन नेपाळी कामगारांचा मृत्यू

दळे येथे तीन नेपाळी कामगारांचा मृत्यू

राजापूर : तालुक्यातील दळे येथे एकाच दिवशी तीन नेपाळी कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील दळे येथील सलीम काझी यांच्या बागेत काम करणाऱ्या तीन नेपाळी कामगारांचा रविवारी रात्री आकस्मिक मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना धारतळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्यासह लांजाचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास साळुंखे, राजापूरचे पोलीस निरीक्षक परबकर, नाटे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत होते.

Web Title: Three Nepali workers killed at Dale