शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कशेळीनंतर आणखी तीन गावात सौरऊर्जेचा प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:27 IST

लवकरच ही गावे विजेपासून स्वयंपूर्ण होणार

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील कशेळी गावामध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात येत असतानाच चिपळूण तालुक्यातील आणखी तीन गावे या प्रकल्पामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ४ गावांमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे १,६६९ गावे साैरऊर्जेने उजळणार आहेत. ही गावे विजेपासून स्वयंपूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणारी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. ‘रुफ टॉप सोलर सिस्टिम’साठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येते. वीज ग्राहकाला कमीत कमी ३० हजार रुपयांपासून ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान निश्चित करण्यात आले आहे.राजापूर तालुक्यातील कशेळी गाव ९६५ लोकसंख्या असलेले, तसेच ६१६ घरे असलेले गाव आहे. हे गाव जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ‘मॉडेल’ म्हणून घेण्यात आले आहे. त्यानंतर चिपळूण तालुक्यातील तनाळी, आंबेरे आणि मोरवणे या तीन गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. ही गावेही हा प्रकल्प राबवण्यास तयार झाली आहेत. त्यामुळे लवकरच ही गावे विजेपासून स्वयंपूर्ण होणार आहेत. ही योजना राबवण्यासाठी महावितरण, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि सर्व पंचायत समित्या प्रयत्नशील आहेत.

वीज निर्मिती अनुदान

  • १ किलो वॅटसाठी - ३० हजार रुपये
  • २ किलो वॅटसाठी - ६० हजार रुपये
  • ३ किलो वॅटसाठी - ७८ हजार रुपये

गाव - घरे - लोकसंख्या

  • कशेळी - ६१६ - ९६५
  • तनाळी - ४२० - ९३६
  • आंबेरे - १८३ - ६५४
  • मोरवणे - ४५० - १३५०
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण