शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

तीन महिने अगोदरच मूर्तिशाळांमध्ये बाप्पांच्या मूर्ती आकाराला...

By admin | Updated: June 17, 2015 00:38 IST

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या वापरास मज्जाव करण्यात येत असला तरी मोठ्या मूर्तींसाठी सर्रास वापर सुरू आहे.

रत्नागिरी : आजपासून बरोब्बर तीन महिने... तीन महिन्यांनी बाप्पांचं आगमन होणार. पण तीन महिने अगोदरच बाप्पांच्या मूर्ती चित्रशाळांमध्ये आकार घेऊ लागल्या आहेत.वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागते, त्या बाप्पांचे आगमन यावर्षी अधिक मासामुळे लांबले आहे. आषाढ अधिक मास असल्यामुळे गणेश चतुर्थीचा सण १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवास अजून तीन महिने शिल्लक असले तरी मूर्तिशाळेमध्ये मात्र कामाची लगबग सुरू झाली आहे. महागाईने उच्चांक निर्माण केला आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढतो, परिणामी मजूरी, रंग, मातीचे दर वधारल्याने यावर्षी मूर्तींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणून भक्तिभावाने त्या पूजल्या जातात. यावर्षी गणेशोत्सव १७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करणाऱ्या चित्रशाळेत कामाची लगबग सुरू झाली आहे. बहुतांश मूर्तिकार अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर माती भिजवून कामाचा शुभारंभ करतात. प्रामुख्याने शाडूच्या मूर्ती तयार केल्या जातात. शाडूची माती गुजरात येथील भावनगर येथून मागवली जाते. भावनगरहून पेण येथे अधिकतम माती आयात केली जाते. तेथून महाराष्ट्रभर मातीचे वितरण केले जाते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे २०० ते २२५ रूपयांना मिळणारे शाडू मातीचे पोते यावर्षी २५० ते २७५ रूपये दराने विकण्यात येत आहे. भिजवलेल्या मातीचा गोळा साच्यात ठेवून त्याला सुंदर गणेश मूर्तीचा आकार दिला जातो. मूर्तीवरील कोरीव काम, सुबक रंगकाम करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात सध्या संबंधित कारागिरांची उणीव भासू लागली आहे. पावसाळा सुरू असल्याने वातावरणात आर्द्रता असते. परिणामी मूर्ती वाळण्यास वेळ लागतो. शेतीची कामे सुरू असल्याने मजूर नियमित येत नाहीत. तसेच रंगाच्या दरातही वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे बाप्पांच्या मूर्तीच्या दरावर परिणाम होणार आहे.मुंबईतला गणेशोत्सव भक्तांना भुरळ घालतो. त्या ठिकाणी विविध आकारातील, रूपातील आकर्षक मूर्ती पाहायला मिळतात. त्यामुळे फोटोच्या स्वरूपात किंवा व्हाटस्अप, मोबाईलव्दारे फोटो पाठवून मूर्ती तयार करण्यास सांगण्यात येते. इंटरनेटवरील सोशल साईट्सव्दारे कार्टून्सपासून पौराणिक कथेतील अर्जुन, परशुराम, महादेव, बालगणेश, हनुमान रूपातील गणेशमूर्ती तयार करण्याची गळ मूर्तिकाराला घातली जाते. सव्वा इंचापासून साडेतीन चार फुटी गणेशमूर्ती भक्त तयार करून घेतात. सार्वजनिक गणेशमूर्ती चार ते बारा फुटी असतात. मुंबई, पुणेसारख्या शहरात मोठमोठ्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मंडळांमध्ये चुरस लागलेली असते. बहुतेक मोठ्या मूर्ती जागेवरच तयार केल्या जातात, जेणेकरून हलवताना त्याचा त्रास होत नाही. तसेच मोठ्या मूर्ती मातीऐवजी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या तयार करण्यात येतात. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या वापरास मज्जाव करण्यात येत असला तरी मोठ्या मूर्तींसाठी सर्रास वापर सुरू आहे. शाडूची माती महाग पडत असल्याने काही मूर्तिकारांनी लाल चिकटमातीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)लाल मातीपेक्षा शाडूची मूर्ती पाण्यात लवकर विरघळते. मात्र, त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नसल्यामुळे तीन - चार वर्षांत लाल मातीपासून गणपती तयार करण्यात येत आहेत. लाल मातीतील कठीण गुणधर्मामुळे मूर्ती चांगली बनते. बहुतांश गणपती मूर्ती लाल मातीव्दारे बनवण्यात येत आहेत. अन्य काही कारखानदारही लाल मातीचा वापर करू लागले आहेत.- सुशील कोतवडेकर, मूर्तिकार, नाचणे, रत्नागिरी.