शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीला तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट, आतापर्यंत ६६ टक्के पाऊस

By शोभना कांबळे | Updated: August 1, 2023 18:38 IST

रत्नागिरी : हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला मंगळवारपासून तीन दिवसांचा पुन्हा आॅरेज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २०,१४३ मिलिमीटर ...

रत्नागिरी : हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला मंगळवारपासून तीन दिवसांचा पुन्हा आॅरेज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २०,१४३ मिलिमीटर (सरासरी २२३८ मिलिमीटर) इतका पाऊस पडला आहे. गेल्या दोन महिन्यांची सरासरी पावसाने केवळ १५ दिवसांत ओलांडली आहे. आतापर्यंत ६६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ५७ टक्के पाऊस पडला होता.जून महिन्याच्या शेवटी पावसाची सुरुवात झाली तरीही पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पाऊस जून आणि जुलैची सरासरी भरून काढेल का, अशी साशंकता निर्माण झाली होती. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाची हुलकावणी होती. परंतु, गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पडलेल्या पावसाने जिल्ह्याला दिलासा दिला आहे.सोमवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मधूनच उन्हाचे दर्शनही घडत आहे. मात्र, अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. मंगळवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दापोली, चिपळूण तालुक्यात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मंडणगड, गुहागर, लांजा, खेड येथेही पाऊस चांगला झाला आहे.जिल्ह्याला मंगळवारपासून पुन्हा तीन दिवसांचा आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुपारपर्यंत पाऊस सरींवर होता. सायंकाळनंतर मात्र पावसाचा जोर अधिक वाढला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस