शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता व्यवस्थापनात रत्नागिरीसह जिल्ह्यातील तीन बसस्थानके चमकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:04 IST

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान; कुडाळला तृतीय क्रमांक

रत्नागिरी : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने मुंबई प्रादेशिक स्तरावर अग्रस्थान मिळवले आहे. विभागातील बसस्थानकांनी स्वच्छता आणि व्यवस्थापनातील आपली क्षमता सिद्ध केली आहे. रत्नागिरीचे मध्यवर्ती बसस्थानक (अ वर्ग), पाली (ब वर्ग), आणि माखजन (क वर्ग) या बसस्थानकांनी आपापल्या गटात चमकदार कामगिरी केली आहे.जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अभियानाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्रैमासिक सर्वेक्षण अहवालात बसस्थानकाची स्वच्छता, प्रशासन, व्यवस्थापन आणि हरित उपक्रम अशा विविध निकषांवर आधारित गुणांकन केले गेले. सर्वेक्षणानुसार ‘अ’ वर्गवारीत रत्नागिरी (नवीन) मध्यवर्ती बसस्थानकाने ८९ गुण मिळवून सर्वाधिक आघाडी घेतली.यामध्ये बसस्थानक व प्रसाधनगृहासाठी ३० पैकी २९ गुण, बसस्थानक व्यवस्थापनासाठी ५० पैकी ४४ गुण आणि हरित बसस्थानकासाठी ३० पैकी १६ गुण मिळाले. या कामगिरीमुळे रत्नागिरीने प्रथम क्रमांक मिळवला, तर बोईसरने ८३ गुण मिळवून द्वितीय आणि कुडाळने ७४ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.  ‘ब’ वर्गवारीत पाली बसस्थानकाने ८४ गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. मुंबईतील दादर बसस्थानकाने ८५ गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर ‘क’ वर्गवारीत माखजन बसस्थानकाने ७४ गुण मिळवले. या वर्गवारीतील परळ बसस्थानकाने (मुंबई) ८९ गुण मिळवून प्रथम स्थान मिळवले, नालासोपारा (पालघर) बसस्थानकाने ७६ गुण मिळवून द्वितीय आणि माखजन (संगमेश्वर) बसस्थानकाने ७४ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.  हा निकाल पहिल्या त्रैमासिक सर्वेक्षणानंतर जाहीर करण्यात आला. एकूण चारवेळा सर्वेक्षण होणार असून, नंतर जे बसस्थानक स्वच्छ आणि सुंदर या निकषांमध्ये बसेल, त्याला बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.