आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक

By Admin | Updated: July 14, 2015 01:31 IST2015-07-14T01:30:02+5:302015-07-14T01:31:36+5:30

पोलीस अधीक्षक : कणकवली, कुडाळ, सावंतवाडीतील घरफोडी

Three arrested in the interstate gang | आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक

आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक

सिंधुदुर्गनगरी : महिनाभर कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या शहरांमध्ये घडलेले घरफोडीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस दलाने जिल्ह्यात ‘आॅपरेशन आॅल आऊट व आॅपरेशन कोंबिंग’ ही मोहीम राबवून जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तीन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात यश आले आहे. तर अद्यापही एका आरोपीचा शोध सुरु आहे. ही टोळी मूळची मध्य प्रदेश येथील असून, यातील उर्वरित आरोपींना लवकरच गजाआड करू, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुरेश सुभान मोहेल (वय २०), अशोक ध्यानसिंग अजनार (२५), रमेश जवान सिंह (२५) सर्व राहणार बघोली, ता. कुक्सी, जिल्हा धार- मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. दरम्यान, वरील तिन्ही संशयितांना २१ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात १ जूनपासून कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या शहरांसह अन्य शहरांमध्ये एकूण २४ घरफोड्या दाखल झालेल्या आहेत. त्यापैकी वरील तिन्ही तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार घरफोड्या झालेल्या आहेत. या घरफोड्या एका ठरावीक विशिष्ट प्रकारे गुन्हे करणाऱ्या टोळीने केल्या असल्याची शक्यता होती
हे आरोपींनी केलेल्या
गुन्ह्याच्या कार्यप्रणालीवरून स्पष्ट होत होते.
घरफोडीतील गुन्हेगार लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी जिल्ह्यात १० जुलैला आॅपरेशन आॅल आऊट ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेमध्ये पोलीस अधीक्षकांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत संपूर्ण रात्रभर गुन्हेगारांचा शोध घेत होते.
या मोहिमेत जिल्ह्यातील १० अधिकारी १०० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे आरोपी सुरेश मोहेल याला तळगाव क्रॉसिंग येथे सायंकाळी ६.३० वाजता अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Three arrested in the interstate gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.