शीळ येथे पाइप फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST2021-06-18T04:22:44+5:302021-06-18T04:22:44+5:30

राजापूर : राजापूर नगर परिषदेची शीळ येथील पाइपलाइन फुटल्याने अनेकांना चक्क कारंजाचे दर्शन झाले़ ही पाइपलाइन फुटल्याने माेठ्या ...

Thousands of liters of water wasted due to burst pipe at Sheel | शीळ येथे पाइप फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

शीळ येथे पाइप फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

राजापूर : राजापूर नगर परिषदेची शीळ येथील पाइपलाइन फुटल्याने अनेकांना चक्क कारंजाचे दर्शन झाले़ ही पाइपलाइन फुटल्याने माेठ्या प्रमाणात पाणी वाया गेले़ मात्र, तरीही नगर परिषद प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही न झाल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राजापूर नगर परिषदेच्या मालकीची ती पाइपलाइन असून, ती जुनी असल्याचे समजते़. दरम्यान, अचानक ती फुटल्याने त्यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर फेकले जात आहे़ पाइपलाइन फुटलेल्या जागी कारंजाचे स्वरूप प्राप्त झाले आहे़ त्यामुळे अनेकांना फुकटात कारंजे पाहायला मिळत आहे़ मात्र, एवढे होऊनही राजापूर नगर परिषद प्रशासनाकडून तातडीने त्याची दखल घेण्यात आली नाही़ परिणामी, मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले़ पाइपलाइन फुटून सुरू असलेली गळती अद्याप सुरूच आहे़

Web Title: Thousands of liters of water wasted due to burst pipe at Sheel