शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पाऊसमान सामान्यच, हवामान विभागाचे महासंचालक डाॅ. मृत्यूंजय माेहपात्रांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 15:05 IST

सध्याच्या दाेन टप्प्यातील अंदाज धाेरणात बदल करुन देशभरातील नैऋत्य माेसमी पावसासाठी मासिक आणि हंगामी अंदाज प्रसिद्ध करण्यासाठी नवीन धाेरण लागू

रत्नागिरी : गतवर्षी अतिवृष्टीचा सामना करावा लागला असतानाच यावर्षी मात्र जून ते सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात पाऊस सामान्य (सरासरीच्या ९६ - १०४ टक्के) राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डाॅ. मृत्यूंजय माेहपात्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. १९७१ - २०२० या कालावधीतील पावसाचा अभ्यास करता यावर्षी पावसाची दीर्घ कालावधीची सरासरी ८७ सेंटीमीटर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावर्षीच्या २०२२च्या नैऋत्य माेसमी पावसाची माहिती देण्यासाठी गुरुवारी ऑनलाईन पत्रकार परिषद आयाेजित करण्यात आली हाेती. या पत्रकार परिषदेत डाॅ. मृत्यूंजय माेहपात्रा यांनी यावर्षी पाऊस सामान्य राहणार असल्याचे सांगितले. भारतीय हवामान विभागाकडून संपूर्ण देशभरातील सरासरी पावसाचा दीर्घकालीन पूर्वानुमान दाेन टप्प्यांत प्रसिद्ध केला जाताे. पहिल्या टप्प्याचा अंदाज एप्रिलमध्ये तर दुसरा टप्पा किंवा अपडेट अंदाज मे अखेरीला प्रसिद्ध केला जाताे.सध्याच्या दाेन टप्प्यातील अंदाज धाेरणात बदल करुन देशभरातील नैऋत्य माेसमी पावसासाठी मासिक आणि हंगामी अंदाज प्रसिद्ध करण्यासाठी नवीन धाेरण लागू करण्यात आल्याची माहिती डाॅ. माेहपात्रा यांनी दिली. नवीन पद्धतीमध्ये विद्यमान सांख्यिकीय अंदाज प्रणालीसह भारतीय हवामान विभागाच्या मान्सून मिशन क्लायमेट फाेरकास्ट सिस्टीमसह विविध जागतिक हवामान अंदाज आणि संशाेधन केंद्रांवर आधारित नवीन विकसित मल्टी - माॅडेल एन्सेम्बल अंदाज प्रणाली वापरण्यात आल्याचे डाॅ. माेहपात्रा यांनी सांगितले.

हवामान विभागाने १९७१ - २०२० या कालावधीतील पावसाचा अभ्यास करुन अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार जून ते सप्टेंबर महिन्यात देशभरात पावसाचे प्रमाण सामान्य राहणार आहे. द्विपकल्पीय भारताच्या उत्तरेकडील भाग आणि लगतच्या मध्य भारताच्या अनेक भागांमध्ये, हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्य ते सामान्यापेक्षा जास्त माेसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, उत्तर भारत आणि दक्षिण द्विपकल्पीय दक्षिण भागात काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस