लांजात ३५ रुग्ण काेराेना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:41+5:302021-05-05T04:51:41+5:30

लांजा : तालुक्यात सोमवारी कोरोनाचे एकूण ३५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे काेराेनाची एकूण रुग्णसंख्या १३६६ झाली आहे, तर ...

Thirty-five patients in Lanza tested positive | लांजात ३५ रुग्ण काेराेना पाॅझिटिव्ह

लांजात ३५ रुग्ण काेराेना पाॅझिटिव्ह

लांजा : तालुक्यात सोमवारी कोरोनाचे एकूण ३५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे काेराेनाची एकूण रुग्णसंख्या १३६६ झाली आहे, तर गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये कोरोनाने पाचजणांचा बळी घेतला आहे.

तालुक्यात साेमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये अँटिजेन कोरोना चाचणीमध्ये २४, तर आरटीपीसीआरमध्ये ११ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये वेरवली कोंड येथील १, कोर्ले बौध्दवाडी येथील १, लांजा आगरगाव ७, पुनस येथील १, लांजा शहर ३, बापेरे बौध्दवाडी येथील १, गवाणे कनवलेवाडी येथील १, लांजा बौध्दवाडी येथील १, खावडी पितळेवाडी येथील १, लांजा गणेश वसाहत येथील १, रुण पराडकरवाडी येथील ३, लांजा पोलीस वसाहत येथील ३, प्रभानवल्ली सोनारवाडी येथील ३, लांजा आगरगाव १, रुण येथील १, रुण गोंधवली येथील १, रुण कोसंबवाडी येथील १, रुण घुडसडा येथील १, रिंगणे बौध्दवाडी येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात ९८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ३३० कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत तालुक्यात एकूण ५५ जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.

Web Title: Thirty-five patients in Lanza tested positive